बॉलिवूडमधील अनेक दिग्गज अभिनेत्रींमध्ये श्रद्धा कपूरचे नाव आवर्जून घेतलं जातं. आपल्या सहजसुंदर अभिनयाने श्रद्धा सतत चर्चेत असते. ‘लव्ह का दी एंड’ या चित्रपटातून तिने चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले. पण ‘आशिकी २’ या चित्रपटाने तिला अधिक प्रसिद्धी मिळाली. या चित्रपटामध्ये तिच्याबरोबर आदित्य रॉय कपूरही दिसला होता. ही जोडी प्रेक्षकांनी खूप पसंत केली होती. त्यानंतर तिने अनेक चित्रपटांमध्ये विविध भूमिका केल्या आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती सतत चाहत्यांच्या संपर्कात असते पण आता ती चर्चेत येण्याचे कारण थोडे वेगळे आहे. (Shraddha kapoor viral video)
श्रद्धाचा सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यामध्ये ती कॅमेरामॅनबरोबर मस्ती करताना दिसत आहे. श्रद्धाने एका कार्यक्रमामध्ये उपस्थिती लावली होती. ती बाहेर पडत असताना अचानक तिची नजर तिथे असलेल्या कॅमेरामॅनवर पडते. ते सर्वजण पिझ्झा खात असतात. तिथे जाऊन श्रद्धा त्यांना “काय खात आहात?” असे विचारते आणि “भूक लागली होती” असे म्हणते.
त्यावर त्यांना ती विचारते, “अजून एक आहे का?”, ती केवळ एक घास मागते. पण कॅमेरामॅन तिला पूर्ण पिझ्झा तिला देऊ करतात. त्यावर ती विचारते, “नक्की मी घेऊ?” , त्यावर कॅमेरामॅन म्हणतात, “हो नक्की, इथे खूप आहेत”. श्रद्धाच्या या वागण्यावर तिथे असलेले सगळेच खूप खुश होतात आणि तिचे कौतुकही करतात. यावेळी ती एका पिच रंगाच्या चमकदार ड्रेसमध्ये दिसून आली.
श्रद्धाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. तिच्या या स्वभावाचे अनेकांनी खूप कौतुक केले आहे. तर काही जणांनी तिच्या या वागण्यावर आक्षेप दर्शवला असून ओव्हरॲक्टिंग करत असल्याचे म्हंटले आहे. एका नेटकाऱ्याने कमेंट केली आहे की, “ही खूप निस्वार्थी आहे”, दुसरा नेटकरी म्हणाला की, “ही किती गोड आहे”, तसेच अजून एक नेटकरी म्हणाला की, “हीला नेहमी ओव्हरॲक्टिंग करायची असते. श्रद्धाच्या या व्हिडीओला संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या आहेत.