अभिनय कौशल्य, सुंदर आवाज, सौंदर्य आणि तितकीच सुशील अशी ओळख असलेली बॉलिवूड अभिनेत्री म्हणजे श्रद्धा कपूर. श्रद्धा कपूरचा साधेपणा आणि गोड स्वभाव चाहत्यांच्या कायम पसंतीस उतरतो. आपल्या सुंदर दिसण्याने व क्युट स्वभावामुळे चर्चेत राहणारी अभिनेत्री सध्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. कपूरशी संबंधित एक मोठी बातमी समोर येत आहे. ते म्हणजे तिचे ब्रेकअप झाल्याचे बोलले जात आहे. श्रद्धाने कथित प्रियकर राहुल मोदीबरोबरचे सर्व संबंध तोडल्याचा दावा केला जात आहे. (Shraddha Kapoor breakup)
राहुलच्या कुटुंबापासूनही अंतर राखले आहे. याबद्दल अद्याप काहीही अधिकृतपणे समोर आलेले नाही, परंतु अचानक श्रद्धाने राहुल मोदीला इन्स्टाग्रामवर अनफॉलो केले आहे. अभिनेत्रीने केवळ राहुलच नाही तर त्याची बहीण, प्रॉडक्शन हाऊस आणि त्याच्या कुत्र्याचे अकाऊंटही अनफॉलो केले असल्याचे समजत आहे. काही दिवसांपूर्वी श्रद्धाने राहुल मोदींबरोबरचा एक फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला होता. श्रद्धाच्या त्या इंस्टाग्राम स्टोरीवरून हे दोघेही एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा झाल्या होत्या.
आणखी वाचा – “लॉकडाउनमध्ये माझा घटस्फोट झाला आणि…”, सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा मोठा खुलासा, एकट्याने करते मुलाचा सांभाळ
श्रद्धाने काही दिवसांपूर्वी पहिल्यांदा राहुलबरोबरचा सेल्फी फोटो शेअर केला होता आणि कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “तुझं मन तुझ्याकडे ठेवलं तर चालेल. पण मला माझी झोप परत कर मित्रा.” तसंच याआधी श्रद्धाने तिच्या गळ्यात आर अक्षर असलेले लॉकेटदेखील घातल्याचा फोटोही शेअर केला होता. त्यामुळे या दोघांच्या नात्याविषयी अनेक चर्चा झाल्या होत्या. अशातच आता त्यांच्या नात्यात दुरावा असल्याचे म्हटलं जात आहे.
दरम्यान, ‘सोनू के टीटू की स्वीटी’, ‘प्यार का पंचनामा’ आणि ‘तू झूठी मैं मकर’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलेला राहुल मोदी व्यवसायाने लेखक आहे. श्रद्धाबरोबर त्याची पहिली भेट ‘तू झुठी मैं मक्कर’च्या सेटवर झाली होती. दोघांमध्ये आधी मैत्री झाली आणि नंतर या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. या वर्षी मार्चमध्ये अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांनी गुजरातमधील जामनगरमध्ये प्री-वेडिंग पार्टी आयोजित केली होती, ज्यामध्ये श्रद्धा आणि राहुल एकत्र दिसले होते.