Bigg Boss Marathi 5 Updates : ‘बिग बॉस मराठी’ सीझन ५ ने साऱ्यांना भुरळ घातली आहे. यंदाच्या या नव्या पर्वात आलेल्या नव्या स्पर्धकांनी अल्पावधीतच राडा घालायला सुरुवात केली आहे. एकापेक्षा एक वरचढ असलेले स्पर्धक यंदाच्या या पर्वात धुमाकूळ घालताना दिसत आहेत. यंदाच्या या पर्वात निक्की तांबोळी ही स्पर्धक अगदी पहिल्या दिवसापासून चर्चेत असलेली पाहायला मिळत आहे. ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांचा निक्कीने केलेला अपमानही साऱ्या जगाने पाहिला. यावरुन भाऊचा धक्कामध्ये रितेश देशमुखने निक्कीची चांगलीच कानउघडणी केली. आणि तमाम प्रेक्षकांसमोर निक्कीला वर्षा यांची माफीही मागायला लावली.
दरम्यान, निक्कीने स्वतःचा असा एक वेगळा ग्रुप केलेला दिसत आहे. ‘बिग बॉस’च्या या घरात आता दोन गट पडले आहेत. त्यापैकी एका गटात निक्की तांबोळी, जान्हवी किल्लेकर, वैभव चव्हाण, अरबाज पटेल, घनःश्याम दरवडे हे स्पर्धक दिसत आहेत. मात्र या स्पर्धकांमध्येही नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोवरुन वाद झालेला पाहायला मिळत आहे. निक्कीचा आवाज, निक्कीची दादागिरी, निक्कीची स्ट्रॅटर्जी आता तिच्याबरोबर असलेल्या स्पर्धकांनाही खटकू लागली आहे.
टास्कवरुन झालेल्या भांडणात निक्कीने घेतलेली बाजू अरबाजला खटकली आणि अरबाज व निक्कीमध्ये बाचाबाची झालेली पाहायला मिळाली. निक्कीने यावेळी अरबाजला मला attitude दाखवू नको असंही सुनावलं. यावरुन अरबाजचा इगोही दुखावला. अरबाज पाठोपाठ आता निक्की व तिची खास मैत्रीण जान्हवी यांचंही फिस्कटलं असल्याचं दिसत आहे. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये जान्हवी निक्की विरोधात बोलताना दिसत आहे.
आणखी वाचा – “लॉकडाउनमध्ये माझा घटस्फोट झाला आणि…”, सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा मोठा खुलासा, एकट्याने करते मुलाचा सांभाळ
समोर आलेल्या प्रोमोमध्ये जान्हवी वैभवला सांगते, “मला हे लोक नाही आवडत. सगळे चुकीचं वागत आहेत, खोटं वागत आहेत. आपण गोष्टी करतोय आणि निक्की क्रेडिट घेऊन जातेय. आपलं प्लॅनिंग चुकीचं आहे. निक्कीच्या डोक्यात पण ही गोष्ट आली नव्हती”. एकूणच जान्हवीचे हे बोलणे ऐकून तिला निक्कीचे वागणे खटकले असल्याचं दिसत आहे. जान्हवीने निक्की गेम प्लॅन खेळत आहे आणि तिचं वागणं चूक आहे असं म्हणत रडताना दिसत आहे.