शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

मोठी बातमी! शिल्पा शेट्टीच्या घरावर ईडीची धाड, नवरा राज कुंद्राच्या पॉर्नोग्राफी प्रकरणी कारवाई

Saurabh Moreby Saurabh More
नोव्हेंबर 29, 2024 | 11:56 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bollywood actress Shilpa Shetty house ED raided in connection with her husband Raj Kundra pornography case.

शिल्पा शेट्टीच्या घरी ईडीची धाड, राज कुंद्रा पॉर्नोग्राफी केस संबंधित मोठी कार्यवाही

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी ईडीची धाड पडली आहे. त्याचं कारण तिचा नवरा राज कुंद्रा ठरला आहे. पॉर्नोग्राफी केस प्रकरणाशी संबंधित असलेल्या प्रकरणावरुन आता ईडीनं त्यांच्या घरी धाड घातली आहे. सकाळी ०६ वाजता शिल्पा शेट्टीच्या सांताक्रूझ येथे असलेल्या घरी अधिकाऱ्यांनी ही धाड टाकली. पॉर्नोग्राफी केस प्रकरणात राज कुंद्राला यापूर्वी अटक झाली होती. वृत्तानुसार पॉर्नोग्राफी प्रकरणात फक्त राज कुंद्रा नाही तर त्याच्याबरोबर आणखी काही लोकांचा सहभाग आहे. त्या इतर लोकांच्या घरीदेखील तपास सुरु आहे. (ED raids Shilpa Shetty House Shilpa Shetty) 

ही कारवाई मोबाइल ॲप्सद्वारे पॉर्न सामग्री तयार करण्याशी संबंधित आहे आणि ही चौकशी मुंबई पोलिसांच्या २०२१ च्या प्रकरणावर आधारित आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ईडीच्या टीमने या प्रकरणी एकूण १५ ठिकाणी छापे टाकले आहेत. वास्तविक, या प्रकरणात देशात जमा झालेला पैसा या व्हिडिओंच्या माध्यमातून परदेशात हस्तांतरित करण्यात आला होता. यात मोठ्या प्रमाणात पैसे एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी ट्रान्सफर करण्यात आले असून, याप्रकरणी ईडीकडून तपास सुरु करण्यात आला आहे.

View this post on Instagram

A post shared by Shilpa Shetty Kundra (@theshilpashetty)

आणखी वाचा – हिरवा चुडा, फुलांचे दागिने अन्…; रेश्मा शिंदेच्या दाक्षिणात्य लूकला मराठमोळा टच, हळदी स्पेशल फोटो समोर

वास्तविक, फेब्रुवारी २०२१ मध्ये मुंबई पोलिसांनी मड आयलंडवर असलेल्या एका बंगल्यावर छापा टाकला होता. छाप्यात त्या बंगल्यात अ‍डल्ट चित्रपटांचे शूटिंग होत असल्याचे उघड झाले होते. पोलिसांनी त्या बंगल्याची चौकशी केली असता या चित्रपटांच्या निर्मितीमागे राज कुंद्राचा हात असल्याचे आढळून आले.

आणखी वाचा – सोनाक्षी-झहीर यांच्या लग्नावर आई पूनम सिन्हा अजूनही नाराज?, ‘त्या’ व्हायरल व्हिडीओमुळे चर्चांना उधाण

अडल्ट कन्टेन्ट तयार करण्याबाबतच्या आरोपत राज कुंद्रा यांच्या कंपनीचे नाव आले होते. याच प्रकरणाचा तपास करण्यासाठी ईडीने आज उत्तर प्रदेश आणि मुंबईत एकूण १५ ठिकाणी छापेमारी केली आहे. यात शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या घराचाही सहभाग आहे. या छापेमारीत ईडीकडून सर्च ऑपरेशन राबवले जात आहे.  

Tags: ED raids Shilpa Shetty house shilpa shettyshilpa shetty husband raj kundrashilpa shetty raj kundra latest news
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

filmmaker Manish Gupta stabbed driver
Entertainment

धक्कादायक! बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध दिग्दर्शकाचा ड्रायव्हरवर चाकूने हल्ला, जागीच कोसळला अन्…; संपूर्ण घटना समोर

जून 7, 2025 | 11:13 am
Dia Mirza Pregnancy
Women

…अन् गरोदरपणात दिया मिर्झाला झाला नको तो संसर्ग, लेकाच्या जीवावरही बेतलं, ३६ तासांनी शस्त्रक्रिया झाली आणि…

जून 7, 2025 | 10:00 am
Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
Next Post
Zarina Wahab on Kangana Ranaut

"कंगना राणौत अनेकदा माझ्या घरी…", आदित्य पांचोलीच्या एक्स्ट्रा मॅरेटेल अफेअरबाबत पत्नीची प्रतिक्रिया, म्हणाली, "माझा नवरा…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.