गेल्या काही दिवसांपासून मराठी अभिनेत्री रेश्मा शिंदेच्या लग्नाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेच्या टीमने रेश्माचं पहिलं केळवण केलं होतं. यानंतर अभिज्ञा भावे आणि अनुजा साठे या दोघींनी रेश्माचं दुसरं केळवण साजरं केलं होतं. सोशल मीडियावर तिच्या केळवणाची चर्चा सुरु असतानाच बुधवारी रात्री अभिनेत्री मेहंदीचे फोटो शेअर करत सर्वांना सुखद धक्का दिला. तेव्हापासून तिच्या लग्नाची सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे. अशातच नुकताच रेश्माचा हळदी सोहळा पार पडला आणि या हळदी सोहळ्याचे काही खास फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. (Reshma Shinde Haldi Look)
रेश्मा आणि तिच्या नवऱ्याने हळदी समारंभासाठी खास ट्विनिंग केल्याचं पाहायला मिळालं. अभिनेत्रीने हळदीसाठी खास दाक्षिणात्य पद्धतीचा लूक केला होता. हळदी रंगाचा लेहेंगा, त्यावर हिरवा पदर, पिवळा ब्लाऊज, फुलांचे दागिने आणि मोकळे केस असा खास लूक अभिनेत्रीने हळदी सोहळ्यासाठी केला होता. या हळदी स्पेशल लूकमध्ये अभिनेत्री रेश्मा शिंदे खूपच सुंदर दिसत होती. तर, तिच्या होणाऱ्या नवऱ्यानेही तिच्या हळदी लूकलं साजेसा असा पिवळ्या रंगाचा कुर्ता घातला होता. दोघेही या लूकमध्ये अतिशय सुंदर दिसत आहेत.
रेश्माला हळद लागल्याचे अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. केळवण सुरू झाल्यापासून अभिनेत्रीने तिचा होणारा नवरा नेमका कोण आहे? याबाबत कोणतीही माहिती उघड केली नव्हती. मात्र, नुकत्याच व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये रेश्माच्या होणाऱ्या नवऱ्याची झलक स्पष्टपणे दिसत आहे. त्यामुळे आपल्या अभिनयाने चर्चेत राहणारी रेश्मा शिंदे आता तिच्या आयुष्यातील एका नवीन प्रवासाला सुरुवात करणार आहे.
आणखी वाचा – सोनाक्षी-झहीर यांच्या लग्नावर आई पूनम सिन्हा अजूनही नाराज?, ‘त्या’ व्हायरल व्हिडीओमुळे चर्चांना उधाण
दरम्यान, रेश्माच्या मेहंदीमध्ये लग्नाची तारीख स्पष्टपणे दिसली. यावरुन २९ नोव्हेंबरला अभिनेत्री लग्न करणार असल्याचं समोर आलं. त्यामुळे रेश्मा आज लग्नबंधनात अडकणार आहे. तिच्या घरी लग्नाआधीच्या विधींनी सुरुवात झाली. रेश्माला नुकतीच हळद लागली असून अभिनेत्री आता विवाहबंधनात अडकणार आहे. त्यामुळे तिच्या लग्नाची सध्या चाहत्यांना उत्सुकता लागून राहिली आहे.