बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असणारे एक नाव आहे. सोनाक्षी ही तिच्या चित्रपटांमुळे नाही तर तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. सोनाक्षीने तब्बल सात वर्ष डेट केल्यानंतर झहीर इक्बालबरोबर लग्न केले. सलमान खानच्या घरीच सोनाक्षी व झहीरची पहिली भेट झाली. पहिल्याच भेटीमध्ये हे दोघे अनेक तास गप्पा मारत बसले होते. सुरुवातीला लोकांनी सोनाक्षी सिन्हावर झहीरबरोबर लग्न करत असल्याने टीका केली होती. मात्र लेकीच्या निर्णयात शत्रुघ्न सिन्हा हे तिच्याबरोबर असल्याचे बघायला मिळाले. लेकीवर होणाऱ्या प्रत्येक टीकेला त्यांनी उत्तर दिलं. (Poonam Sinha Upset on Sonakshi Sinha and Zaheer Iqbal’s Marriage)
अशातच सोनाक्षी सिन्हाच्या आईचे तिच्या लग्नासंबंधित एक वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. संपूर्ण सिन्हा कुटुंब पहिल्यांदाच जावई झहीरबरोबर ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मध्ये सहभागी झाले होते. यावेळी पूनम सिन्हा आणि शत्रुघ्न सिन्हा त्यांच्या मुलीच्या लग्नाबद्दल आणि जावयाबद्दल बोलताना दिसले. या शोमध्ये सोनाक्षीची आई पूनमने असे काही सांगितले की, सर्वजण थक्क झाले. कपिलने पूनम यांना विचारले की, “लग्नाच्या वेळी तुम्ही मुलगी सोनाक्षीला काय सल्ला दिला होता?”
What did it mean lol
byu/Used_Confection6060 inBollyBlindsNGossip
आणखी वाचा – रेश्मा शिंदेच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात, होणाऱ्या नवऱ्याची नावाची लागली हळद, व्हिडीओ व्हायरल
यावेळी पूनम सिन्हा यांनी असं म्हटलं की, “माझी आई नेहमी म्हणायची की, तू नेहमी तुझ्यावर प्रेम करणाऱ्या माणसाशी लग्न कर, मी ते ऐकलं आणि तसं केलं. पण माझ्या मुलीने काय केले? तिचं ज्याच्यावर प्रेम होते, त्याच्याशी तिने लग्न केले”. यानंतर सोनाक्षीच्या आईने जे सांगितले ते ऐकून सोनाक्षीही थक्क झाली. पण सोनाक्षीने ते खूप छान हाताळले. आईच्या वक्तव्यानंतर सोनाक्षी सिन्हा म्हणाली की, “झहीरला वाटते की, तो माझ्यावर जास्त प्रेम करतो आणि मला वाटते की, मी त्याच्यावर जास्त प्रेम करते. आता हे कोडं नेमकं कोण सोडवणार?”
दरम्यान, सोनाक्षी आणि झहीरने दोघांनी एकमेकांना ७ वर्षे डेट केल्यानंतर यावर्षी २३ जून रोजी मुंबईत लग्न केले. झहीर आणि सोनाक्षीने एकत्र काम केले आहे. दोघे ‘डबल एक्सएल’मध्ये एकत्र दिसले होते. या चित्रपटात हुमा कुरेशीही महत्त्वाच्या भूमिकेत होती. दोघे सोशल मीडियावर कायम सक्रीय असतात . सोशल मीडियावर ते त्यांचे अनेक मजेशीर व्हिडीओ शेअर करत असतात आणि चाहतेही या दोघांच्या व्हिडीओला चांगलाच प्रतिसाद देतात.