बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी ईडीची धाड पडली आहे. त्याचं कारण तिचा नवरा राज कुंद्रा ठरला आहे. पॉर्नोग्राफी केस प्रकरणाशी संबंधित असलेल्या प्रकरणावरुन आता ईडीनं त्यांच्या घरी धाड घातली आहे. सकाळी ०६ वाजता शिल्पा शेट्टीच्या सांताक्रूझ येथे असलेल्या घरी अधिकाऱ्यांनी ही धाड टाकली. पॉर्नोग्राफी केस प्रकरणात राज कुंद्राला यापूर्वी अटक झाली होती. वृत्तानुसार पॉर्नोग्राफी प्रकरणात फक्त राज कुंद्रा नाही तर त्याच्याबरोबर आणखी काही लोकांचा सहभाग आहे. त्या इतर लोकांच्या घरीदेखील तपास सुरु आहे. (ED raids Shilpa Shetty House Shilpa Shetty)
ही कारवाई मोबाइल ॲप्सद्वारे पॉर्न सामग्री तयार करण्याशी संबंधित आहे आणि ही चौकशी मुंबई पोलिसांच्या २०२१ च्या प्रकरणावर आधारित आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ईडीच्या टीमने या प्रकरणी एकूण १५ ठिकाणी छापे टाकले आहेत. वास्तविक, या प्रकरणात देशात जमा झालेला पैसा या व्हिडिओंच्या माध्यमातून परदेशात हस्तांतरित करण्यात आला होता. यात मोठ्या प्रमाणात पैसे एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी ट्रान्सफर करण्यात आले असून, याप्रकरणी ईडीकडून तपास सुरु करण्यात आला आहे.
आणखी वाचा – हिरवा चुडा, फुलांचे दागिने अन्…; रेश्मा शिंदेच्या दाक्षिणात्य लूकला मराठमोळा टच, हळदी स्पेशल फोटो समोर
वास्तविक, फेब्रुवारी २०२१ मध्ये मुंबई पोलिसांनी मड आयलंडवर असलेल्या एका बंगल्यावर छापा टाकला होता. छाप्यात त्या बंगल्यात अडल्ट चित्रपटांचे शूटिंग होत असल्याचे उघड झाले होते. पोलिसांनी त्या बंगल्याची चौकशी केली असता या चित्रपटांच्या निर्मितीमागे राज कुंद्राचा हात असल्याचे आढळून आले.
आणखी वाचा – सोनाक्षी-झहीर यांच्या लग्नावर आई पूनम सिन्हा अजूनही नाराज?, ‘त्या’ व्हायरल व्हिडीओमुळे चर्चांना उधाण
अडल्ट कन्टेन्ट तयार करण्याबाबतच्या आरोपत राज कुंद्रा यांच्या कंपनीचे नाव आले होते. याच प्रकरणाचा तपास करण्यासाठी ईडीने आज उत्तर प्रदेश आणि मुंबईत एकूण १५ ठिकाणी छापेमारी केली आहे. यात शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या घराचाही सहभाग आहे. या छापेमारीत ईडीकडून सर्च ऑपरेशन राबवले जात आहे.