Zarina Wahab on Kangana Ranaut : अभिनेत्री जरीना बहावने अलीकडेच अनेक मुलाखतींद्वारे खुलासे केले आहेत. अशातच अभिनेत्रीने तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत केलेलं भाष्य चर्चेत आलं आहे. अभिनेत्रीने तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत धक्कादायक खुलासे केले आहेत. अभिनेत्रीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिचा मुलगा सूरजच्या लव्ह लाईफ आणि पती आदित्य पांचोलीच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्सबद्दल सांगितले. आदित्य व कंगनाच्या अफेअरवर जरीनानेही प्रतिक्रिया दिली. अभिनेत्री म्हणाली की, “ती कंगनाबरोबर नेहमीच चांगली होती. कंगना अनेकदा त्यांच्या घरी येत असे, असेही तिने सांगितले.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान जरीना म्हणाली की, “कंगना अनेकदा माझ्या घरी यायची. आदित्यही तिच्याशी चांगलं वागायचा. तीही चांगली वागली. मात्र त्यांनतर कुठे आणि काय बिघडले ते मला माहीत नाही. मी एवढेच म्हणेन की त्याला जे दिसत नव्हते ते मी पाहिले आणि शेवटी तेच झाले”. याशिवाय जेव्हा अभिनेत्रीला विचारण्यात आले की, “आदित्यवर शिवीगाळ केल्याचा आरोप आहे, तेव्हा तुम्हालाही हे कधी खरे वाटले आहे का?”.
आणखी वाचा – आईच्या अभिनयाचं लेकाकडून कौतुक, पोस्ट शेअर करत विशाखा सुभेदार भावुक, म्हणाल्या, “त्याच्याकडून ही शाबासकी…”
हा प्रश्न विचारताच अभिनेत्रीने स्पष्ट नकार दिला. जरीना म्हणाली, “तो कधीही अपमानास्पद नवरा नव्हता. तो माझ्यासाठी खूप प्रिय आहे. पण तो खूप गोड आहे त्याच्या मैत्रिणीने त्याच्यावर गैरवर्तन केल्याचा आरोप केला कारण तिला जे हवे होते ते मिळाले नाही”, असं अभिनेत्री उघडपणे बोलली. आदित्य पांचोलीच्या अफेअर्सबद्दल बोलताना जरीना म्हणाली, “घरी आल्यावर तो माझ्याबरोबर कसा होता हे मी पाहिलं. आदित्य एक अद्भुत पिता आहे”.
आणखी वाचा – हिरवा चुडा, फुलांचे दागिने अन्…; रेश्मा शिंदेच्या दाक्षिणात्य लूकला मराठमोळा टच, हळदी स्पेशल फोटो समोर
या मुलाखतीदरम्यान नवऱ्याबरोबर बोलताना झरिना लेक सूरजबद्दलही बोलली. तो म्हणाला की, “जेव्हा सूरज जियाबरोबर रिलेशनशिपमध्ये होता, त्याआधीही जियाने तीन ते चार वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला होता. पण सूरजची वेळ आल्यावर हा प्रकार घडला”. जिया २ जून २०१३ रोजी जिया मुंबईतील तिच्या घरात मृतावस्थेत आढळून आली होती.