बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी मुंबईतील बास्टियन रेस्टॉरंटची मालक आहे. अलीकडेच शिल्पाच्या रेस्टॉरंटच्या बाहेर असे काही घडले ज्याची लोक स्वप्नातही कल्पना करू शकत नाहीत. तिच्या आलिशान रेस्टॉरंटसमोरून सुमारे १ कोटी किमतीची महागडी कार चोरीला गेली आहे. ही कार एका बड्या उद्यागपतीची असल्याचं म्हटलं जात आहे. रुहान खान असं त्याचं नाव आहे. कारच्या मालकाने या कार चोरीची तक्रार छत्रपती शिवाजी पार्क पोलिस स्थानक केली आहे. तक्रारीनुसार कार पार्किंग परिसरात पार्क केल्यानंतर काहीच मिनिटात चोरीला गेली आहे. (Shilpa Shetty Restaurant Outside Car Stoled)
रुहान खान २७ ऑक्टोबरच्या रात्री दोन वाजता मित्रांबरोबर दादरमधील बॅस्टियन रेस्ट्रॉरंट क्लब मध्ये पोहोचले होते. त्यांनी त्यांची कार रेस्ट्रॉरंटच्या स्फाटकडे पार्किंगसाठी दिली. तिथल्या कर्मचाऱ्यानं ती कार बेसमेंटमध्ये पार्क केली. कार पार्क केल्यानंतर काहीच मिनिटांत तिथं जीममध्ये दोनजण बेसमेंटमध्ये पार्किंग परिसरात आले होते. त्यांनी ही पार्क केलेली बीएमडब्ल्यू कार चोरी केली. ही घटना तिथल्या सीसीटीव्हीमध्येही कैद झाली आहे. पहाटे चार वाजता जेव्हा क्लब बंद झाला, तेव्हा रुहान यांनी रेस्ट्रॉरंटच्या स्फाटला कार घेऊन येण्यास सांगितलं. तेव्हा कार गायब झाल्याचं समोर आलं.
आणखी वाचा – सुप्रसिद्ध गायिकेची मृत्यूशी झुंज, पतीच्या निधनानंतर अवस्था वाईट, मुलाने सांगितलं, “परिस्थिती गंभीर…”
त्यानंतर रुहान यांनी पोलिस स्टेशन गाठलं आणि तक्रार नोंदवली. या कारचा तपास करण्यासाठी आता त्या परिसरातले सीसीटीव्ही पोलिस तपासत असल्याचं म्हटलं जात आहे. शिल्पा शेट्टीचे बॅस्टियन हे अलिशान रेस्टॉरंट पूर्वी वरळी परिसरात होतं, मात्र ते बंद झाल्यानंतर आता दादरमधील कोहिनूर टॉवरच्या सर्वात वरच्या मजल्यावर म्हणजेच ४८व्या मजल्यावर स्थलांतरित झालं आहे. अनेक सेलिब्रिटींचंही हे आवडतं ठिकाण बनलं आहे. अनेक लोकप्रिय अभिनेते, अभिनेत्री इथं पार्टी करताना दिसतात.
त्यामुळं तिथं सुरक्षाही तगडी असते. पण आता याच रेस्टॉरंटच्या पार्किंगमधून महागड्या कारची चोरी झाल्याचं समोर आल्यानं खळबळ उडाली आहे. तसेच रुहान खानचे वकील अली काशिफ यांनी या प्रकरणी उच्च न्यायालयात जाणार असल्याचे म्हटलं आहे. त्यांनी या सुरक्षेतील त्रुटींवर प्रश्न उपस्थित केले आणि रेस्टॉरंट निर्धारित वेळेपेक्षा उघडे राहिल्याबद्दल निशाणा साधला आहे. एवढेच नाही तर खुलेआम दारू पिणे हे कायद्याचे उल्लंघन असल्याचे त्यांनी म्हटले आहे.