Sharda Sinha Health Update : शनिवरी २६ ऑक्टोबरला गायिका शारदा सिन्हा यांची प्रकृती खालावल्याने त्यांना दिल्ली एम्स रुग्णालयात आयसीयू वॉर्डमध्ये दाखल केल्याचे वृत्त आले होते. निवारी सकाळी त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना आयसीयू वॉर्डमध्ये ठेवण्यात आले आहे. शारदा सिन्हा या ७२ वर्षांच्या आहेत. ज्येष्ठ लोकगायिका शारदा सिन्हा यांना गेल्या काही दिवसांपासून खाण्या-पिण्यातही अनेक समस्या येत होत्या, असे काही अहवालात म्हटले. अशातच त्यांना व्हेंटिलेटरवर हलवण्यात आल्याची बातमी आली होती. मात्र, आता त्यांचा मुलगा अंशुमनने स्वत: व्हिडीओ शेअर करत शारदा सिन्हा यांच्याबद्दलची संपूर्ण हेल्थ अपडेट दिले आहे. (Sharda Sinha Health Update)
त्याचबरोबर त्यांच्या मुलाने शारदा सिन्हा यांच्याबद्दल नकारात्मक बातम्या न पसरवण्याची विनंतीही केली आहे. अंशुमन सिन्हा यांनी इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत म्हटले की, “मी हॉस्पिटलच्या आवारात आहे. आईला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. आईबद्दल काही चुकीच्या बातम्या येत असून त्याचे खंडन करण्यासाठी मी पुढे आलो आहे. शारदा जी सध्या आयसीयूमध्ये आहेत आणि त्यांच्या प्रकृतीशी झुंज देत आहेत. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्याचे काही वृत्तवाहिन्यांवर बोलले जात आहे आणि एम्सच्या संचालकांनी ही बातमी दिल्याचे ते म्हणत आहेत. पण हे पूर्णपणे चुकीचे आहे. शारदा सिन्हा या व्हेंटिलेटरवर नाहीत, त्या ऑक्सिजन सपोर्टवर आहेत. परिस्थिती निश्चितच गंभीर आहे, परंतु व्हेंटिलेटरवर असणे म्हणजे लोकांना याची माहिती मिळताच त्यांची अर्धी आशा संपुष्टात येते. पण तसे नाही. त्यांना व्हेंटिलेटरवर नाहीत”.
आणखी वाचा – Video : अनाथ, वृद्धांसाठी जुई गडकरीचा मदतीचा हात, शेअर केला खास व्हिडीओ, कौतुकाचा वर्षाव
यापुढे अंशूमन यांनी असं म्हटलं आहे की, “शारदाजी पूर्णत: शुद्धीत आहेत, आज मी त्यांना भेटलो आणि वंदना (त्याची मुलगी)ही भेटली. त्यांना सध्या आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. कृपया याविषयी कोणतीही नकारात्मकता पसरवू नका. शारदा जी २०१७ पासून मल्टिपल मायलोमा (रक्त कर्करोग)शी लढत आहेत. आपल्या कुटुंबातील सर्वांना हे माहीत आहे. माझी वैयक्तिक वेदना सर्वांबरोबर सांगायची गरज नाही, अशी त्यांची इच्छा होती. त्यामुळे आम्ही सुरुवातीपासूनच गुप्तता पाळली होती. ती एकदा आयसीयूमध्ये गेली होती पण तिथून ती व्यवस्थित बाहेर आली आहे. सध्या डॉक्टरांची टीम त्यांच्यावर उपचार करत आहे आणि ते त्यांचे सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत”.
दरम्यान, शारदा सिन्हा या एक लोकप्रिय लोकगायिका आणि शास्त्रीय गायिका आहेत. त्या मूळच्या बिहारच्या रहिवासी आहेत. शारदा सिन्हा या मैथिली व भोजपुरी गाण्यांसाठी ओळखल्या जातात. त्यांच्या काही प्रसिद्ध गाण्यांमध्ये ‘विवाह गीत’ आणि ‘छठ गीत’ यांचा समावेश आहे. ‘मैंने प्यार किया’ मधील ‘काहे तो सजना’सारख्या काही बॉलिवूड गाण्यांणं त्यांचा आज लाभला आहे. ‘हम आपके है कौन’ आणि ‘गँग्स ऑफ वासेपूर’ सारख्या चित्रपटांमध्येही त्यांनी गाणी गायली आहेत.