देशात आता काही दिवसांतच दिवाळीची धामधूम सुरु होणार आहे. अगदी काहीच दिवस उरले असून बॉलिवूड कलाकारांमध्येही उत्साह दिसून येत आहे. फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राने दिवाळी निमित्त पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीसाठी सर्वच कलाकारांनी हजेरी लावली होती. यावेळी उपस्थित असलेल्या कलाकारांच्या लूकने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले असून सोशल मीडियावर याची चर्चा सुरु आहे. करिश्मा कपूर, नोरा फतेही, जान्हवी कपूर, कार्तिक आर्यन, निलम कोठारी, सोनाली बेंद्रे, गौरी खान, शिल्पा शेट्टी, शमिता शेट्टी, रविना टंडन, करण जोहर, आदित्य रॉय कपूर असे इतर अनेक कलाकार उपस्थित होते. याचबरोबर स्टार किड्सनेदेखील हजेरी लावली होती. (manish malhotra diwali party)
मनीषच्या पार्टीला सुहाना खान, राशा थडानी हे स्टारकिड्स दिसून आले होते. यावेळी रविनाची मुलगी राशावर सगळ्यांच्याच नजरा खिळल्या. राशाने चंदेरी रंगाचा शिमरी लेहंगा परिधान केला होता. तसेच सुहानाने लाल रंगाची सुंदर अशी साडी नेसली होती. राशा १९० वर्षांची असून सुहानाचे वय २४ वर्ष आहे. मात्र सगळ्यांना सुहानापेक्षा राशाचा लूक अधिक भावला. तसेच सुहाना टीकेलादेखील समोरे जावे लागले.
दरम्यान आता मनीषच्या पार्टीमध्ये राशा व सुहाना एकदम नटून-थटून पोहोचल्या होत्या. राशाच्या सौंदर्याचीदेखील अधिक चर्चा होत असलेली पाहायला मिळते. लवकरच ती चित्रपटांमध्येदेखील दिसून येऊ शकते. तसेच सुहानाने याआधी झोया अख्तरच्या ‘द आर्चिस या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. तसेच आता ती वडील शाहरुख खानबरोबर ‘किंग’ या चित्रपटांमध्ये दिसून येणार आहे.
सुहाना व राशा यांच्या वयामध्ये पाच वर्षांचे अंतर आहे. मात्र तरीही राशा सौंदर्याच्या बाबतीत सुहानाला टक्कर देते. इंटरनेटवर राशा व सुहानाचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मात्र यामध्ये सुहाना व राशाचे वडील दिसून आले नाहीत. शाहरुख खान सध्या माध्यमांपासून दूर असलेला दिसून येत आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतरही शाहरुख त्यांच्या घरी गेला नाही. मात्र गौरी खान व सुहाना अनेकदा एकत्र दिसून येत आहे.