शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“तो माझा देव, माझा जीव घ्या पण…”, सलमान खानच्या घरावर गोळीबार झालेला राखी सावंतला सहन होईना, म्हणाली, “खरं काय माहित नाही तरीही…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
एप्रिल 17, 2024 | 1:46 pm
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
Rakhi Sawant On Salman Khan

"तो माझा देव, माझी जीव घ्या पण…", सलमान खानच्या घरावर गोळीबार झालेला राखी सावंतला सहन होईना, म्हणाली, "खरं काय माहित नाही तरीही…"

अभिनेता सलमान खान सध्या चर्चेत आला आहे. सलमान खानच्या घरावर रविवारी पहाटे गोळीबार करण्यात आला. पहाटे ५ वाजताच्या सुमारास त्यांनी गोळ्या झाडल्या. हे दोघेही हल्लेखोर दुचाकीवरुन अभिनेत्याच्या घरापर्यंत आले होते. या प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेकडून तपास सुरु होता. आता याप्रकरणी गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत दोन आरोपींना गुजरातमधून अटक करण्यात आलं असल्याचं समोर आलं आहे. या आरोपींची ओळख पटवण्यात आली असून यासंदर्भात पोलिसांनी व्हिडीओही शेअर केला आहे. (Rakhi Sawant On Salman Khan)

या व्हिडीओनंतर आता अनेक कलाकार मंडळींनी सलमान खानच्या समर्थनार्थ पोस्ट शेअर केली आहे. सलमान खान याच्याबरोबर जे काही घडलं ते अत्यंत चुकीचं आहे असं म्हणत काहींनी पोस्ट शेअर केल्या आहेत. अशातच अभिनेत्री राखी सावंत हिने सलमानच्या समर्थनार्थ शेअर केलेल्या एका व्हिडीओने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. राखीला आजवर सलमान खानने बरीच मदत केली आहे. राखीच्या आईच्या आजारपणावेळीही सलमान त्यांच्या मदतीला धावून आला होता. आज सलमानच्या जीवावर काहीजण उठताच राखीने विनंती करणारा एक व्हिडीओ शेअर केला आहे.

आणखी वाचा – Video : बाईक राईड, धमाल अन्…; गोव्यामध्ये तितीक्षा तावडे व सिद्धार्थ बोडकेची भटकंती, बहीण म्हणाली, “आई शप्पथ…”

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

राखीने हा व्हिडीओ शेअर करत असं म्हटलं आहे की, “तुम्हाला कोणाचा जीव घ्यायचा असेल तर माझा जीव घ्या. मी एक सर्वसामान्य मनुष्य आहे. आणि तुम्हा सर्वांची बहीण आहे. अगदी हात जोडून मी तुम्हाला विनंती करते की, तुम्ही सलमान खानबरोबर असं चुकीचं करु नका. सलमान भाऊ माझ्यासाठी देवता आहेत. माझी आई मृत्यूशी झुंज देत होती तेव्हा त्यांनी पैशांची मदत करत ऑपरेशन करुन घेतलं. करोना काळात मला आर्थिक मदत हवी होती तेव्हाही त्यांनी मला कसलाही विचार न करता पैशांची मदत केली. याहून चांगला माणूस शोधून सापडणार नाही”.

आणखी वाचा – “२८वर्षांपूर्वी आमचं लग्न झालं आणि…”, रवी किशन यांच्या विरोधात महिलेचा अजब दावा, म्हणावी, “आमच्या मुलीसाठी मी…”

पुढे राखी म्हणाली, “मी आवाज चढवून नाही तर नम्रतेने हात जोडून विनंती करते की असं करु नका. तुम्ही मला माझ्या भावासारखे आहात. मी हिंदू कुटुंबातील मुलगी आहे. काय खरं, काय खोटं हे मला माहित नाही, पण तरी मी हात जोडून तुम्हाला विनंती करेन की, सलमान खान यांच्या विरोधात काही चुकीचं करु नका”.

Tags: bollywood newsrakhi sawantRakhi Sawant On Salman Khansalman khan home firing
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Pooja Sawant wished her husband Siddesh Chavan on his birthday through a special video

लग्नानंतर नवऱ्याच्या पहिल्या वाढदिवसाचं ऑस्ट्रेलियामध्ये जंगी सेलिब्रेशन करतेय पूजा सावंत, हातातील हिरव्या चुड्याने वेधलं लक्ष, म्हणाली, "ज्याने माझं आयुष्य..."

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.