रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“२८वर्षांपूर्वी आमचं लग्न झालं आणि…”, रवी किशन यांच्या विरोधात महिलेचा अजब दावा, म्हणावी, “आमच्या मुलीसाठी मी…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
एप्रिल 16, 2024 | 1:03 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Ravi Kishan Wife Statement

"२८वर्षांपूर्वी आमचं लग्न झालं आणि...", रवी किशन यांच्या विरोधात महिलेचा अजब दावा, म्हणावी, "आमच्या मुलीसाठी मी..."

अभिनेता व गोरखपूरचे खासदार रवी किशन शुक्ला सध्या अडचणीत सापडले असून एका विशेष कारणामुळे चर्चेत आले आहेत. मुंबईतील एका महिलेने लखनऊमध्ये पत्रकार परिषदेत त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. याचबरोबर महिलेने तिचे आणि तिच्या मुलीचे अनेक फोटोही दाखवले आहेत. लग्न करण्याबरोबरच या महिलेने अनेक आरोप केले असून न्यायालयात धाव घेणार असल्याचेही सांगितले. यावर खासदार रवी किशन यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. (Ravi Kishan Wife Statement)

मुंबईतील रहिवासी अपर्णा ठाकूर यांनी सोमवारी लखनऊमध्ये पत्रकार परिषदेत रवी किशन हा तिचा नवरा असल्याचा दावा केला. अपर्णाने सांगितले की, “१९९५ मध्ये ती मुंबईत पत्रकार म्हणून काम करत होती. ती एका कार्यक्रमाला गेली होती, तिथे तिची भेट रवी किशन यांच्याशी झाली. तेव्हापासून दोघेही एकत्र होते. १९९६ मध्ये रवी किशनने कुटुंब व मित्रपरीवारासमोर मंगळसूत्र घालत लग्न केलं. हा विवाह मुंबईतच झाला”. यानंतर आता महिलेने असा दावा केला आहे की, रवी किशन आणि तिला एक मुलगी देखील आहे. लेकीला तिचा हक्क मिळवून देण्यासाठी ती आता न्यायालयात जाणार आहे.

आणखी वाचा – मनोज वाजपेयीचा ‘सायलेन्स’ ते राजपाल यादवचा ‘काम चालू है’, येत्या आठवड्यात ड्रामा, थ्रिलर व सस्पेन्सने भरलेले चित्रपट पाहता येणार, जाणून घ्या…

I said yesterday that Ms Aparna ji is going to court. And this is the proof. All the best to #RaviKishan Bhayya! pic.twitter.com/xRTHvAej94

— KRK (@kamaalrkhan) April 15, 2024

अपर्णा म्हणाल्या की, “गेल्या २५ वर्षांपासून रवी किशनने कधीही आपल्या मुलीला हक्क देण्याबाबत भाष्य केलं नाही. ही गोष्ट त्यांनी नेहमी लपवून ठेवली. तो नेहमी म्हणत असे की, आपल्या मुलीसाठी काहीतरी केले पाहिजे पण ते कधी केले नाही. गेले वर्षभर त्याने बोलणेही बंद केले. यानंतर आता मला कायदेशीर कारवाई करावी लागणार आहे. मी फक्त माझ्या मुलीच्या हक्कासाठी लढणार आहे. मुलगी आता मोठी झाली आहे. केवळ रवी किशनच्या आग्रहाखातर शाळेतही मुलीच्या वडिलांचे नाव लिहिले जात नव्हते. कारण, हे इतर लोकांना कळू नये असे त्याला वाटत होते”.

आणखी वाचा – ‘प्रेमाची गोष्ट’मध्ये कार्तिकचं सत्य सांगूनही इंद्राचा मुक्ताला दोष, सागरसमोर प्रकरण येताच घेणार का बायकोची बाजू?

यावेळी त्या महिलेबरोबर आलेल्या मुलीने सांगितले की, “मला माझ्या वडिलांचे प्रेम कधीच मिळाले नाही. तो घरी यायचा. आम्ही त्याला भेटायचो, पण तो निघून जायचा. जास्त दिवस तो कधीच थांबला नाही. मी त्याच्याशी अनेकदा बोलले पण त्याने मला कधीच मदत केली नाही. मागच्या वेळी मला १० हजार रुपयांची गरज होती. मी त्याच्याकडे पैसे मागितले. मात्र, त्याने मला पैसे दिले नाहीत. याशिवाय, एकदा मी त्याच्याशी चित्रपटात येण्याबद्दल बोलले आणि त्याला एका दिग्दर्शकाशी बोलण्यास सांगितले. मात्र त्याने तिथेही माझी मदत केली नाही. मी बॉलिवूड अभिनेत्री लारा दत्तासह एक चित्रपट केला आहे. ज्यात मी त्यांच्या मुलीची भूमिका केली होती. या चित्रपटासाठी मला ऑडिशनही द्यावे लागले. हा चित्रपट मला ऑडिशननंतर मिळाला. माझ्या वडिलांनी मला कधीही कोणत्याही प्रकारे मदत केली नाही”.

Tags: bollywood actorentertainmentravi kishanRavi Kishan Wife Statement
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
Next Post
Titeeksha tawde and siddharth bodke enjoying at goa

Video : बाईक राईड, धमाल अन्…; गोव्यामध्ये तितीक्षा तावडे व सिद्धार्थ बोडकेची भटकंती, बहीण म्हणाली, "आई शप्पथ…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.