शुक्रवार, सप्टेंबर 4, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“बेडरुममध्ये बोलावत अयोग्यरित्या स्पर्श केला अन्…”, सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा दिग्दर्शकावर गंभीर आरोप, म्हणाली, “मी घाबरुन…”

Saurabh Moreby Saurabh More
ऑगस्ट 24, 2024 | 4:49 pm
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
Bangali actress Sreelekha Mitra allegations against Malayalam director Ranjith for touching her inappropriately.

सुप्रसिद्ध अभिनेत्रीने दिग्दर्शकावर केले गंभीर आरोप, चुकीचा स्पर्श केल्याबद्दलचा वाईट अनुभवही सांगितला

मल्याळम सिनेसृष्टी सध्या एका कारणामुळे चर्चेत आहे आली आहे. अलीकडेच एका मल्याळम अभिनेत्रीने अभिनेता दिलीपवर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केले होते. यानंतर न्यायमूर्ती हेमा समितीच्या अहवालात मल्याळम फिल्म इंडस्ट्रीतील महिलांची असुरक्षितता आणि परिस्थितीचा उल्लेख करण्यात आला होता. अशातच आता एका बंगाली अभिनेत्रीने मल्याळम दिग्दर्शकावर गंभीर आरोप केले आहेत. बंगाली चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री श्रीलेखा मित्राने मल्याळम दिग्दर्शक रंजीत यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. अभिनेत्रीने दावा केला आहे की, रणजीतने तिला एकदा आपल्या बेडरूममध्ये बोलावले आणि तिला अयोग्यरित्या स्पर्श केला. यानंतर अभिनेत्री माफी मागून खोलीबाहेर आली.

श्रीलेखाने सांगितले की ही घटना २००९मध्ये घडलेली असून आता १५ वर्षांनंतर श्रीलेखाने या घटनेबाबत आपले मौन सोडले आहे. अभिनेत्री (पालेरी माणिक्यम : ओरू पाथिरकोलापथकथिंते)च्या ऑडिशनसाठी गेली असताना तिच्याबरोबर हा प्रकार झाला. एका टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत श्रीलेखाने रंजीत यांच्यावर आरोप केले आहेत. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, श्रीलेखा म्हणाली की, “चित्रपट निर्मात्याने मला त्याच्या बेडरूममध्ये बोलावले. बेडरूममध्ये अंधार होता आणि त्यात बाल्कनी होती आणि संभाषणादरम्यान त्याने माझ्या बांगड्यांना हात लावला. त्याने मला काही माहित नसल्यासारखे भासवले. यामुळे मी थोडे अस्वस्थ झाले. पण मी संभाषण सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला”.

View this post on Instagram

A post shared by Sreelekha Mitra (@sreelekhamitraofficial)

आणखी वाचा – “राखी सावंतला आणा तरच…”, Bigg Boss Marathi वरुन शशांक केतकरच्या बायकोचं वक्तव्य, म्हणाली, “कृपया…”

श्रीलेखा पुढे म्हणाली की, “मी कोणतीही प्रतिक्रिया देत नसल्याचे पाहून त्याने माझ्या मानेला हात लावला आणि माझ्या शरीराला स्पर्शही केला. जे मला सहन होत नव्हते. मी माफी मागितली आणि खोलीबाहेर पडली. हे अत्यंत क्लेशकारक होते आणि मी ही घटना तेव्हा कोणाशीही शेअर करू शकली नाही. या घटनेनंतर मी घाबरून हॉटेलमध्येच राहिले. विचार करत होते की, १० जणांनी येऊन माझा दरवाजा ठोठावला तर काय होईल? मी सकाळ होण्याची वाट पाहत राहिली. माझ्यासाठी हे धक्कादायक नव्हते, कारण मला माहित आहे की इंडस्ट्रीत अशा गोष्टी चालतात . इथे चांगले व वाईट लोक आहेत”.

आणखी वाचा – “तुम्हाला जाऊन दोन महिने पूर्ण झाले पण…”, जय दुधाणे वडिलांच्या आठवणीत भावुक, म्हणाला, “अगदी काल-परवाच…”

चित्रपट निर्माते रंजीत यांनीही श्रीलेखाच्या आरोपांना उत्तर दिले. अभिनेत्रीचे आरोप फेटाळताना ते म्हणाले की, “चित्रपट निर्माते शंकर रामकृष्णन आणि इतर उपस्थित होते. कथित घटना घडली नाही. तिची (श्रीलेखा मित्रा) ऑडिशन चांगली नव्हती आणि तिला याबद्दल माहिती देण्यात आली. त्यामुळे  हा वाद निर्माण करण्यामागे तिचा एक अजेंडा आहे. त्यावर काही कायदेशीर कारवाई केल्यावर तिला याच पद्धतीने उत्तर दिले जाईल”.

Tags: Bengali NewsRanjithSreelekha MitraSreelekha Mitra Allegation Against Ranjith
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Leena Bhagwat Health Update
Entertainment

मराठी अभिनेत्रीचा आवाजाशी सामना, छोटीशी सर्जरीही झाली, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आणि…

सप्टेंबर 2, 2026 | 11:20 am
Kapil Honrao Social Media Break
Entertainment

तुलना, प्रेशर अन्…; मराठी अभिनेत्याचा मोठा निर्णय, सोशल मीडियाला केला रामराम, म्हणाला, “शर्यतीपासून…”

सप्टेंबर 2, 2026 | 9:45 am
Aali Mothi Shahani Teaser
Entertainment

हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये यांच्या ‘आली मोठी शहाणी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

सप्टेंबर 1, 2026 | 1:04 pm
Paach Footacha Bachchan
Entertainment

कीर्तन विश्व उलगडणाऱ्या ‘पाच फुटाच्या बच्चन’चा टीजर समोर, दिसणार तगड्या कलाकारांची फौज

सप्टेंबर 1, 2026 | 11:20 am
Next Post
prathamesh parab and kshitija ghosalkar

लग्नाला सहा महिने पूर्ण होताच प्रथमेश परबने बायकोबरोबरचा शेअर केला रोमँटिक व्हिडीओ, पाहा Unseen Moments

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.