रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss Marathi : “तुमचा माज, दादागिरी बंद होणार…”, रितेश देशमुख जान्हवी किल्लेकरला घराबाहेर काढणार, रडत बाहेर निघाली अन्…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑगस्ट 24, 2024 | 3:50 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi  Season 5

'बिग बॉस मराठी' सीझन ५ मध्ये जान्हवी किल्लेकरवर भडकला रितेश देशमुख, घराबाहेर काढलं आणि...

Bigg Boss Marathi  Season 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या पर्वात स्पर्धकांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. यंदाच्या या पर्वातील स्पर्धक बरेच चर्चेत असलेले पाहायला मिळत आहेत. अशातच अगदी पहिल्या दिवसापासून चर्चेत असणारी अभिनेत्री म्हणजे जान्हवी किल्लेकर. जान्हवी किल्लेकर कोणत्या ना कोणत्या कारणावरुन ‘बिग बॉस’मध्ये चर्चेत असलेली दिसली. अशातच या आठवड्यात जान्हवीने केलेलं भाष्य अनेकांना खटकलं. ते म्हणजे तिने पॅडी कांबळे यांचा केलेला अपमान. जान्हवीने घरातील सदस्याबाबत अपमानास्पद वक्तव्य केले. जान्हवीने थेट पंढरीनाथ कांबळे म्हणजेच पॅडी कांबळे यांच्या अभिनय व करिअरबाबत अपमानास्पद वक्तव्य केले.

‘सत्याचा पंचनामा’ या टास्कच्या ब्रेक दरम्यान जान्हवीने पॅडी कांबळे यांच्या अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीवर अपमानास्पद वक्तव्य केले. यावेळी टास्कच्या दरम्यान जान्हवी ही तावातावाने बोलते की, “हे सगळे लोक घाणेरडे आहेत. यांच्यात समोर येऊन बोलण्याचा दम नाही. यांना फक्त अ‍ॅक्टिंग करता येते बाकी काहीच जमत नाही. पॅडी दादा तर काहीतरी अंगात घुसलंय असं वागतात. आयुष्यभर ओव्हर अ‍ॅक्टिंग करून दमले म्हणून ती अ‍ॅक्टिंग आता ते घरात दाखवत आहेत”.

आणखी वाचा – “राखी सावंतला आणा तरच…”, Bigg Boss Marathi वरुन शशांक केतकरच्या बायकोचं वक्तव्य, म्हणाली, “कृपया…”

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

जान्हवीने केलेल्या या अपमानावरुन प्रेक्षकांनी नव्हे तर कलाकार मंडळींनीही तिला ट्रोल केलं. जान्हवीच हे वक्तव्य चुकीचं ठरवत साऱ्यांनी तिची शाळा घेतली. शिवाय भाऊच्या धक्क्यावरही रितेश यांनी तिची शाळा घ्यावी अशी विनंती अनेकांनी केली. नुकताच भाऊचा धक्कावरील एक प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये रितेश जान्हवीची शाळा घेताना दिसत आहेत.

आणखी वाचा – पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेण्याचा जावेद अख्तर यांना पश्चाताप, म्हणाले, “लग्न यशस्वी न होण्यामागे…”

जान्हवीची आता दादागिरी बंद होणार. समोर आलेल्या प्रोमोमध्ये रितेश जान्हवीला बाहेरचा रास्ता दाखवताना दिसणार आहे. “तुम्ही ‘बिग बॉस मराठी’च्या इतिहासातील सगळ्यात वाईट स्पर्धक आहात. तुम्ही इथे सगळ्यांना म्हणता ना ए मी बाहेर काढेन. तुमचा माज, तुमची दादागिरी आज सगळं इथे बंद होणार आहे. आता मी तुम्हाला बाहेर काढणार. दरवाजा उघडा”, असं रितेश रागाने म्हणतो. यावर जान्हवी रडत रडत बाहेर जाताना दिसत आहे.

Tags: bigg boss marathiBigg Boss Marathi  Season 5jahnavi killekar fired
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Next Post
Jay Dudhane shared an emotional post on the completion of two months of his father death

"तुम्हाला जाऊन दोन महिने पूर्ण झाले पण...", जय दुधाणे वडिलांच्या आठवणीत भावुक, म्हणाला, "अगदी काल-परवाच..."

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.