Raghav Parineeti Wedding : बॉलिवूड अभिनेत्री परिणिती चोप्रा व राघव चड्ढा नुकतेच विवाहबंधनात अडकले. उदयपूर येथे दोघांचा शाही विवाहसोहळा पार पडला होता. त्यानंतर अनेक कलाकार व चाहत्यांनी दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव केला होता. अगदी मोजक्याच पाहुण्यांचा उपस्थितीत हा सोहळा पार पडला असून या सोहळ्याचा खास व्हिडिओ तिने शेअर केला आहे. (Parineeti Raghav Wedding Video Out)
परिणीती आणि राघव यांच्या शाही विवाहसोहळ्याकडे चाहत्यांसह सर्वांचे लक्ष लागले होते. आता ही जोडी विवाहबंधनात अडकले असून त्यांच्या शाही सोहळ्यातील अनेक फोटोज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अशातच परिणीतीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर लग्नाचा खास व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तिचा भावाला अश्रू अनावर झाले. त्याचबरोबर तिने राघवला एकदम खास भेट दिली असून ही गोष्ट त्याच्यासाठी खास आठवणीत राहणार आहे.
समोर आलेल्या या व्हिडिओची सुरुवात जिथे हा सोहळा पार पडला, तिथल्या सुंदर अश्या लेक लोकेशनने करण्यात आली आहे. यावेळी नवरदेव व नवरी शाही अंदाजात दिसत आहे. पुढे परिणिती शाही थाटात लग्नमंडपात एन्ट्री करताना दिसली. यावेळी दोघं एकमेकांना फ्लाइंग किस देत आहेत. पुढे लग्नाचे विधी, दोघांची मजामस्ती असे क्षण व्हिडिओत पाहायला मिळत आहे. यावेळी अभिनेत्रीचा भाऊ रडताना दिसला आहे.
हे देखील पाहा – Video : लेक सोहमसह आदेश बांदेकरांचा लालबागच्या राजाच्या मिरवणुकीत भन्नाट डान्स, लालबागच्या रस्त्यांवरील व्हिडिओ व्हायरल
अभिनेत्रीबरोबर उत्तम गायिका असलेल्या परिणीतीने राघवसाठी ‘ओ पिया’ हे खास गाणं गायलं आहे. सनी एमआर, हरजोत कौर आणि गौरव दत्ता यांनी हे गाणं संगीतबद्ध केलं असून युट्यूबवर हे गाणं प्रदर्शितदेखील झालं आहे. “माझ्या नवऱ्यासाठी मी गायलेलं सगळ्यात महत्त्वाचं गाणं. मी तरी काय बोलू… कारण तुझ्याकडे चालत, बरात लपून, “ओ पिया, चल चले आ” हे गाणं गायलं आहे.”, असं कॅप्शन तिने शेअर केलेल्या व्हिडिओला दिलं आहे.
हे देखील पाहा – विवेक अग्निहोत्रींच्या ‘द व्हॅक्सिन वॉर’कडे प्रेक्षकांनी फिरवली पाठ, नाना पाटेकरांचीही जादू फिकी, दोन दिवसांत कमावले फक्त इतके कोटी
दरम्यान, परिणीती आणि राघव यांचा चंढीगढ आणि मुंबईत रिसेप्शन सोहळा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. या सोहळ्याला बॉलिवूडसह विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर सहभागी होणार आहेत. दोघांच्या लग्नाचे अनेक फोटोज व्हायरल झाले असून कलाकारांसह चाहते दोघांनाही त्यांच्या सुखी संसारासाठी शुभेच्छा देत आहेत.