राज्यभरात यावर्षी मोठ्या उत्साहात गणेशोत्सवाचा सण साजरा झाला. दहा दिवस बाप्पाची मनोभावे सेवा केल्यानंतर काल हजारो भाविकांनी साश्रू नयनाने लाडक्या बाप्पाला निरोप दिला. यावेळी मुंबईसह अनेक ठिकाणी मोठ्या जल्लोषात मिरवणुका निघाल्या. मुंबईतही उत्साहापूर्ण वातावरणात मानाच्या गणपतींची मिरवणूक निघाली होती. यावेळी सर्वसामान्यांसह मराठी कलाविश्वात कलाकार मंडळीनी हजेरी लावली होती. (Aadesh & Soham Bandekar in Lalbaghcha Raja visarjan miravnuk)
होम मिनिस्टर कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेले लाडके भावोजी आदेश बांदेकर यांना गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत थिरकण्याचा मोह आवरला नाही. मुलगा सोहमबरोबर आदेश बांदेकर लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाले होते. यावेळी ते व सोहम मंडळातील कार्यकर्त्यांबरोबर बेभान नाचताना दिसले. दोघांनी हा व्हिडिओ त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला असून त्यांच्या व्हिडिओला नेटकऱ्यांनी कमेंटद्वारे प्रतिसाद दिला आहे.
हे देखील पाहा – हातात काठी, डोक्यावर टोपी अन्…; केदारनाथला पोहोचली ‘सैराट’ फेम रिंकू राजगुरु, मंदिराबाहेरील फोटो शेअर करत म्हणाली…
विसर्जन मिरवणुकीवेळी आदेश बांदेकर यांनी एबीपी माझाशी संवाद साधला होता. ते म्हणाले की, “लालबागचा राजा माझ्या खूप जवळचा आहे. त्यामुळे मी दरवर्षी अनंत चतुर्दशीला न चुकता लालबागच्या राजाच्या मिरवणुकीत जातो.”
हे देखील पाहा – मुग्धा वैशंपायनची होणाऱ्या नवऱ्यासाठी वाढदिवसानिमित्त खास पोस्ट, गोव्यातील रोमँटिक फोटो शेअर करत म्हणाली, “माय मॅन…”
आदेश बांदेकरांसाठी गणेशोत्सव विशेष असतो. जितके ते मोठ्या उत्साहात बाप्पाचे आगमन करताना दिसतात, तितकेच ते विसर्जनाच्या मिरवणुकीत सहभागी होताना दिसतात. आदेश बांदेकर यांचं संपूर्ण बालपण अभ्युदयनगरमध्ये गेलं आहे. त्यामुळे ते न चुकता दरवर्षी विविध मंडळाच्या गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत सहभागी होतात. मिरवणुकीवेळी त्यांचा उत्साह बघण्यासारखा असतो.