शुक्रवार, मे 16, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : लालबागच्या राजाच्या मिरवणुकीत मायरा वायकुळचा भन्नाट डान्स, वडिलांसह मजा-मस्ती केली अन्…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
सप्टेंबर 30, 2023 | 1:24 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Myra Vaikul On Ganeshotsav

"भव्य दिव्य बाप्पाची मूर्ती, अन् वाजत गाजत निघालेली मिरवणूक…", आई वडिलांसह मायराने लावली मुंबईतील गणपती बाप्पाच्या विसर्जन सोहळ्याला हजेरी, म्हणाली, "मिरवणुकीचा…"

गणेशोत्सव आणि मुंबईतला गणेशोत्सव हे समीकरणचं निराळं आहे. मुंबईत भव्य दिव्य बाप्पाची मूर्ती, बाप्पाच्या दर्शनासाठी लागलेल्या रांगा, केलेली रोषणाई हे सारं आकर्षण प्रत्येक मुंबईकराला भुरळ पाडत. विशेष म्हणजे अधिक लक्षवेधी बाजू म्हणजे मुंबईतल्या गणपती बाप्पांचे होणारे विसर्जन. या विसर्जनासाठी लाखो लोक मोठ्या संख्येने एकत्र येत बाप्पाला निरोप देतात. संबंध मुंबईकर हा विसर्जनासाठी गोळा होतो. (Myra Vaikul On Ganeshotsav)

भव्य अशा मिरवणुका, ढोल ताशांच्या गजरात गणरायाचं स्वागत, तसेच प्रत्येक मुंबईकर हा त्या मिरवणूक सोहळ्यात बेधुंद होऊन नाचत बाप्पाला निरोप देतो. बरं या सगळ्याचा आनंद कलाकार मंडळींनाही चुकलेला नाही हा. अनेक कलाकार मंडळी हे बाप्पाच्या विसर्जन सोहळ्यात ढोल ताशे वाजवणाऱ्या पथकांमध्ये सहभाग घेतात. तर अनेक कलाकार हे केवळ श्रद्धेपोटी बाप्पाच्या मिरवणुकीत येतात. अशीच सर्वांची लाडकी बालकलाकार मायरा वायकुळही बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाली आहे. नुकताच मायराने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे.

आणखी वाचा – Video : लेक सोहमसह आदेश बांदेकरांचा लालबागच्या राजाच्या मिरवणुकीत भन्नाट डान्स, लालबागच्या रस्त्यांवरील व्हिडिओ व्हायरल

View this post on Instagram

A post shared by Myra Vaikul (@_world_of_myra_official)

मायराने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये मायरा तिच्या आई वडिलांबरोबर मुंबईतल्या गणपती बाप्पाच्या विसर्जनाच्या मिरवणुकीत सहभागी झाली आहे. लोकल ट्रेनने प्रवास करून मायरा मुंबईतल्या गणपती बाप्पाच्या मिरवणुकीसाठी गेली. तिथे जाऊन ती मिरवणुकी बरीच नाचली आहे, तसेच तिच्या चाहत्यांनीही मायरासह फोटो घेतले. मायराने या विसर्जन मिरवणुकीचा मनमुराद आनंद घेतला. ‘मिरवणुकीचा आनंद वेगळाच असतो’ असं कॅप्शन देत मायराने हा व्हिडीओ शेअर केला आहे.

आणखी वाचा – हातात काठी, डोक्यावर टोपी अन्…; केदारनाथला पोहोचली ‘सैराट’ फेम रिंकू राजगुरु, मंदिराबाहेरील फोटो शेअर करत म्हणाली…

मायराच्या घरीही पाच दिवसांकरिता बाप्पाचं आगमन झालं होतं. घरच्या बाप्पाला निरोप देताना मायराला रडू कोसळल्याचेही पाहायला मिळाले. तिचा बाप्पाला निरोप देतानाचा तो व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला होता. तिचे वडील तिची समजूत काढताना व्हिडीओमध्ये दिसले. इतकेच नव्हे तर मायराने तिच्या घरच्या बाप्पाच्या विसर्जनाआधी तिने बाप्पासमोर गाऱ्हाणं देखील घातलं होतं. तिचा गाऱ्हाणं घालतानाचा व्हिडीओही सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला आहे.

Tags: entertainmentmyra vaikulmyra vaikul family
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Water Disadvantages
Lifestyle

तुम्हीही जास्त पाणी पीत आहात का?, फायद्यापेक्षा तोटेच अधिक, नक्की काय होतं?

मे 16, 2025 | 7:00 pm
aamir khan gf gauri airport video
Entertainment

Video : ६०व्या वर्षी आमिर खान प्रेमात, दोन घटस्फोटानंतर रिलेशनशिप, तिच्या खांद्यावर डोकं ठेवत…

मे 16, 2025 | 6:16 pm
Siddhivinayak temple news
Social

हातावरचं पोट, घर भाडं, कमाईच नाही आणि…; सिद्धीविनायक मंदिरात हार, नारळ बंद करताच विक्रेत्यांचे हाल, गरीब परिस्थितीत…

मे 16, 2025 | 4:50 pm
KRK On Muslims
Entertainment

“भारतातील मुस्लिम खूप आनंदी आणि…”, बॉलिवूड अभिनेत्याचं मोठं वक्तव्य, म्हणाला, “रस्त्यावर मरत…”

मे 16, 2025 | 3:44 pm
Next Post
Sukanya Mone replys a User

"जास्त दारू प्यायली का?", सुकन्या मोनेंच्या 'त्या' व्हिडिओवर महिलेची कमेंट, अभिनेत्री म्हणाली, "ही नशा…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.