बॉलिवूडमध्ये अनेक आशा प्रेमकथा आहेत ज्या आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. ९० व्या दशकात एका अभिनेत्रीची प्रेमकथा मोठ्या प्रमाणात चर्चेत राहिली. या अभिनेत्रीने तब्बल ३ लग्न झालेल्या व्यक्तींना डेट केले आहे. सलमान खानबरोबर तिने मनोरंजन क्षेत्रांमध्ये पाऊल ठेवले. हिंदीमध्ये अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर या अभिनेत्रीने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये पाऊल ठेवले. त्यानंतर त्या तमिळ व तेलुगू चित्रपटांमध्ये आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक झाल्या. याचवेळी दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीमध्ये काम करताना त्या दोन लग्न झालेल्या व्यक्तींच्या प्रेमात पडल्या. (nagma love affairs)
या आघाडीच्या अभिनेत्री म्हणजे नगमा. यांचे नाव २००१ साली भारतीय क्रिकेटपटू सौरव गांगुलीबरोबर जोडले गेले होते. त्यावेळी सौरव वैवाहिक होता. दोघांचीही ओळख १९९९ साली विश्वचषकादरम्यान झाली होती. अनेकदा त्यांना एकत्रित स्पॉट केले होते. मात्र सामाजिक कारणांमुळे दोघांनाही वेगळे व्हावे लागले होते. अभिनेत्रीने एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते की, “दोघांच्याही कारियरवर खूप संकट आले होते. त्यामुळे एकाला या नात्यातून बाहेर पडणं गरजेचं होता. त्यामुळे आम्ही दूर झालो”.
त्यानंतर नगमाने भोजपुरी चित्रपटामध्ये आपले नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तिची ओळख तिथे रवी किशनबरोबर झाली, रवी यांच्यादेखील विवाहबाह्य संबंधाबद्दल चर्चा सुरू होत्या. पण त्यांच्या पत्नीचा खूप विश्वास होता. त्यामुळे नगमाबरोबर असलेल्या नात्याला स्वीकारले नाही. हे सगळं विसरून ती रवी यांच्या आयुष्यातून बाहेर पडली. पण आजवर त्यांनी लग्न केले नाही. त्यांनी स्वतःला खूप हिंमतीने सांभाळले.
वयाच्या ४९ व्या वर्षीदेखील त्या अविवाहित आहेत. तसेच त्या राजकारणातदेखील सक्रिय आहेत. नगमा ख्रिश्चन धर्माचे पालन करते. पण तिचा जन्म हिंदू धर्मामध्ये झाला आहे. तिचे वडील हिंदू तर आई मुस्लिम आहे. दरम्यान करियर सुरू झाल्यानंतर तिच्या वडिलांचे निधन झाले होते. याबद्दल तिने अनेकदा मुलाखतीमध्ये सांगितले आहे.