Malaika Arora Traveled Post : अभिनेत्री मलायका अरोरा ही बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. ही अभिनेत्री चित्रपटांमधून दिसत नसली तरीही ती नेहमीच काही ना काही कारणाने चर्चेत असते. विशेषतः अभिनेत्री तिच्या वैयक्तिक आयुष्यातील कारणामुळे चर्चेत राहिलेली पाहायला मिळते. तिच्या व अर्जुन कपूरच्या नात्याची विशेष चर्चा रंगलेली पाहायला मिळते. अशातच बॉलीवूड अभिनेत्री मलायका अरोराने गुरुवारी तिच्या चाहत्यांना एक फोटो पोस्ट करत आश्चर्यचकित केले. यावेळी अभिनेत्रीने भारतीय रेल्वेमधील स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे. अभिनेत्रीचा हा रेल्वेमधील फोटो सध्या चर्चेत आलेला पाहायला मिळत आहे.
समोर आलेल्या फोटोमध्ये मलायका पायजमा घालून सीटवर झोपली आहे आणि तोंडावर मास्क लावून फोन वापरताना दिसत आहे. या व्हायरल फोटोमध्ये मलायका अरोराच्या सीटच्या शेजारी टेबलवर टिफिन व टिश्यू बॉक्स ठेवलेला दिसत आहे. अभिनेत्रीने यावेळी रेल्वेने दिलेली बेडशीट, उशा आणि ब्लँकेटचा वापर केला आहे. इतकंच नव्हे तर प्रवाशादरम्यान ती आरामात वेळ घालवताना दिसत आहे. यावेळी ती त्वचेचीही विशेष काळजी घेताना दिसत आहे. अभिनेत्रीने हा फोटो शेअर करत असं म्हटलं की, “याला अधिक सुंदर करा”.
आणखी वाचा – ए आर रहमान यांच्याकडे आहे कोट्यवधींची संपत्ती, घटस्फोटानंतर बायकोला मिळणार इतके पैसे कारण…
![](https://marathi.itsmajja.com/wp-content/uploads/2024/11/image-40.png)
अर्जुन कपूरपासून ब्रेकअप झाल्याची पुष्टी झाल्यानंतर, ५१ वर्षीय मलायका नोव्हेंबरमध्ये आव्हानांना तोंड देत आहे. नोव्हेंबरच्या चॅलेंजमध्ये ती नऊ गोष्टी करणार आहे. “दारू पिऊ नका”, “आठ तासांची झोप घ्या”, “एक मार्गदर्शक तयार करा”, “दररोज व्यायाम करा”, “दररोज दहा हजार पावले चाला”, “दररोज सकाळी १० वाजेपर्यंत उपवास करा”, “प्रक्रिया केलेले अन्न टाळा”, “रात्री आठ नंतर काहीही खाऊ नका”, “विषारी लोकांपासून दूर राहा”, या गोष्टींचं ती पालन करणार आहे.
आणखी वाचा – Navri Mile Hitlerla : रेवतीबरोबर लग्न करण्यास यशचा नकार, एजेंच्या विरोधात जाऊन लीला नातं जुळवणार का?
मलायका व अर्जुनने २०१६ पासून एकमेकांना डेट करायला सुरुवात केली होती. काही दिवसांपूर्वी ‘सिंघम अगेन’शी संबंधित एका कार्यक्रमादरम्यान अर्जुनने मलायकाबरोबरच्या ब्रेकअपची पुष्टी केली. यापूर्वी मलायकाचा अरबाज खानपासून घटस्फोट झाला होता. त्यांना एक मुलगा आहे, त्याचे नाव अरहान असे आहे.