रविवार, सप्टेंबर 6, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अमोल गंभीर आजाराशी कसा करणार सामना?, अर्जुनने खूश करण्यासाठी दिलं खास गिफ्ट, त्यात अप्पीचाही फोटो अन्…

Saurabh Moreby Saurabh More
नोव्हेंबर 21, 2024 | 5:03 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Appi Amchi Collector Marathi serial update new promo Amol will undergo chemotherapy to treat his illness

अमोलला झालेल्या आजारपणाच्या उपचाराला सुरुवात, अमोल या आजाराला कसा सामोरा जाईल?

‘अप्पी आमची कलेक्टर’ मालिकेत अप्पी व अर्जुन यांना एकत्र आणण्यासाठी अमोल प्रयत्न करत होता आणि त्याच्या या प्रयत्नांना यश आले असून नुकतंच मालिकेत अप्पी व अर्जुन अमोलसाठी एकत्र आले. अर्जुनने अप्पी व अमोलबरोबर राहण्याचा निर्णय घेतला आहे. अप्पी-अर्जुन दोघे अमोलसाठी एकत्र आले आहेत. त्यांना एकत्र आल्याचे पाहून प्रेक्षकही आनंदी झाल्याचे पाहायला मिळाले. मालिकेत सगळं काही ठीक चाललं असतानाच मीठाचा खडा पडला तो म्हणजे अमोलच्या आजारपणाचा. अमोलच्या प्रयत्नानंमुळे अर्जुन-अप्पी एकत्र आले. पण त्यांना एकत्र आणणारा अमोल आजारी पडला. मालिकेत काही दिवसांपूर्वी त्याला आजार झाल्याचे समोर आले होते. (Appi Amchi Collector Serial Updates)

मात्र हा आजार नक्की काय होता? याविषयी कुणालाच काहीच कल्पना नव्हती. अमोलच्या मन:शांतीसाठी त्याला झालेल्या आजाराचं सत्य लपवण्याचा निर्णय स्वप्नील आणि रुपालीने घेतला. दिवाळीच्या तयारीत सगळे असतानाच दीप्या अमोलच्या आजाराचं सत्य सर्वांसमोर मांडतो. हे ऐकून सगळे हादरतात. आता अमोलच्या आजारपणावर उपचार सुरु होणार आहेत. अमोलला झालेल्या आजारपणाच्या उपचारासाठी त्याची किमोथेरपी केली जाणार आहे आणि यासाठी अप्पी व अर्जुन तयारी करुन घेणार आहेत. मालिकेत नुकतंच दिवाळी साजरी झाली आणि दिवाळीनिमित्त घरातील सर्वांनी एकमेकांना भेटवस्तू दिली.

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

आणखी वाचा – Video : अलका कुबल, सई ताम्हणकरसह इतर मराठी कलाकारांच्या गौतमी पाटीलबरोबर रंगल्या गप्पा, चाहत्यांकडून कौतुक

यावेळी अर्जुनने अप्पीसाठी खास भेटवस्तु दिली. यावेळी त्याने अमोललाही खास भेटवस्तू दिली. अर्जुनने अप्पी गळ्यातील लॉकेट दिलं. तसंच त्याने अमोललाही एक लॉकेट दिलं. यात अमोल, अप्पी व अर्जुन यांचा फोटो लावलेला असतो.  यावेळी अप्पी घरातील सर्वांना अमोलच्या उपचाराबद्दल सांगते. अमोलला झालेल्या आजारपणाच्या उपचारासाठी त्याच्यावर किमोथेरपी केली जाणार असून या किमोथेरपीबद्दल ती सर्वांना सांगते. दरम्यान, अमोलच्या किमोथेरपीबद्दल ऐकून घरातील सर्व जण भावुक होतात.

आणखी वाचा – “लोकशाही अशी चालणार का?”, मतदान कमी प्रमाणात झाल्यानंतर सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री संतापली, म्हणाली, “जबाबदारी नाही…”

त्यामुळे आता अमोलच्या या आजारपणात अप्पी व अर्जुन त्याला कशी साथ देणार? आणि अमोलच्या आजारामुळे घाबरलेले अप्पी आणि अर्जुन यातून सावरणार का? अमोल या आजारपणाच्या उपचाराला कसा सामोरं जाणार? यासारखे अनेक प्रश्न चाहत्यांना पडले आहेत आणि या सर्व प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना आगामी भागात पाहायला मिळणार आहेत.

Tags: Appi Amchi Collector Marathi SerialAppi Amchi Collector Marathi Serial UpdatesAppi Amchi Collector Serial Updates
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Suraj Chavan Baby
Entertainment

सूरज चव्हाण झाला बाबा, घरी आली गोड परी, लग्नाच्या वर्षभरातच दिली गुडन्यूज

सप्टेंबर 5, 2026 | 11:03 am
Leena Bhagwat Health Update
Entertainment

मराठी अभिनेत्रीचा आवाजाशी सामना, छोटीशी सर्जरीही झाली, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आणि…

सप्टेंबर 2, 2026 | 11:20 am
Kapil Honrao Social Media Break
Entertainment

तुलना, प्रेशर अन्…; मराठी अभिनेत्याचा मोठा निर्णय, सोशल मीडियाला केला रामराम, म्हणाला, “शर्यतीपासून…”

सप्टेंबर 2, 2026 | 9:45 am
Aali Mothi Shahani Teaser
Entertainment

हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये यांच्या ‘आली मोठी शहाणी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

सप्टेंबर 1, 2026 | 1:04 pm
Next Post
diljit dosanjh fell at stage

Video : कॉन्सर्टदरम्यान गाणं गाताना तोंडावर पडला दिलजीत दोसांझ, स्वतःला सावरलं पण…; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.