बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा नेहमीच चर्चेत असते. अभिनय, नृत्य, बोल्डनेस यामुळे ती नेहमी प्रकाशझोतात असलेली पाहायला मिळते. काही दिवसांपूर्वीच तिच्या वडिलांनी आत्महत्या केल्यामुळे अधिक चर्चेत आली होती. तिच्या वडिलांनी राहत्या घराच्या इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केली होती. मात्र त्यांच्या आत्महत्येचे खरं कारान अद्याप समोर आले नाही. तिचे खासगी आयुष्य हे नेहमीच चर्चेत राहिले आहे. अरबाज खानबरोबर घटस्फोट घेत वेगळी झाली तर नंतर अभिनेता अर्जुन कपूरबरोबर रिलेशनशिपमध्ये आली. मात्र त्यांचे हे नातंदेखील अधिक काळ टिकू शकले नाही. (malaika arora on karan johar)
मलायका अभिनय व नृत्याबरोबरच एक फिटनेस आयकॉन म्हणूनदेखील अधिक प्रसिद्ध आहे. २०२२ साली अभिनेत्रीचा टॉक शो ‘मुव्हींग विथ मलायका’ आला होता. त्यावेळी एका एपिसोडच्या दरम्यान करण जोहर पाहुणा म्हणून आला होता. यावेळी दोघांमधील चांगले बॉंडिंग बघायला मिळाले होते. यावेळी मलायकाला करणने प्रायव्हेट पार्टबद्दलही प्रश्न विचारले होते. या शोच्या दरम्यान त्यांनी खूप गप्पादेखील मारल्या होत्या. यावेळी मस्तीमध्ये मलायका करणच्या मांडीवर येऊन बसली होती.
मलायकाच्या शोवर करणने तिला लग्नाबद्दलचे प्रश्न विचारले. त्याने विचारले की, “यावेळी तुझ्या प्रेमात कोण आहे तसेच आता कोणाशी लग्न करणार आहेस?”, त्यावर मलायकाने उत्तर दिले की, “करण हा माझा सोफा आहे, तुझा नाही. ओके बाय”. त्यानंतर करणने मलायकाच्या पार्श्वभागाबद्दलही विचारले, त्याने विचारले की, “प्रत्येक जण तुझ्या पार्श्वभागाबद्दल चर्चा करतात तेव्हा कसं वाटतं?”, तसेच अभिनेत्रीच्या बेडरूममधील सिक्रेट्सबद्दलही विचारले गेले? हे सर्व प्रश्न ऐकून मलायकाने याची उत्तरं देणं टाळलं.
आणखी वाचा – आई झाल्यानंतर पहिल्यांदाच कार्तिकी गायकवाड कामावर रुजू, कार्यक्रमाला केली सुरुवात, आता दिसते अशी
दरम्यान मलायकाची ही मुलाखत मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. सध्या मलायका अनेक डान्स शोची परीक्षक म्हणून काम पाहत आहे. ‘इंडियाज गॉट टॅलेंट’ या शोमध्ये ती करण जोहर व किरण खेर यांच्याबरोबर दिसून आली होती. लवकरच ती चित्रपटांमध्येही काम करताना दिसून येऊ शकते.