शुक्रवार, एप्रिल 17, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“माझ्या खिशात काही नसताना तिने लग्न केलं आणि…”, बायकोबद्दल बोलताना आदेश बांदेकरांच्या डोळ्यांत पाणी, सुचित्राही रडल्या अन्…

Saurabh Moreby Saurabh More
सप्टेंबर 16, 2024 | 7:36 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Home Minsiter fame Aadesh and Suchitra Bandekar shared a memory about an old photo from their wedding video viral

लग्नातील एक जुना फोटो पाहून आदेश व सूचित्रा बांदेकर भावुक, दोघांनाही कोसळले रडू, व्हिडीओ व्हायरल

‘झी मराठी’ वाहिनीवर गेली वीस वर्ष अव्याहतपणे सुरु असलेल्या ‘होम मिनिस्टर’ या कार्यक्रमाने नुकताच विराम घेतला आहे. या निमित्ताने एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये झी मराठीवरील विविध मालिकांमधील महिला कलाकार सहभागी झाल्या होत्या आणि त्यांच्यामध्ये पैठणीसाठी खेळ रंगला. यावेळी ‘होम मिनिस्टर’ची धुरा आपल्या खांद्यावर सांभाळणारे महाराष्ट्राचे लाडके भावोजी आदेश बांदेकर यांना ‘तुला शिकविन चांगलाच धडा’ फेम अधिपती-अक्षरा यांनी बोलतं केलं. यावेळी आदेश यांना काही खास फोटो दाखवण्यात आले आणि या प्रत्येक फोटोबद्दल आदेश यांनी त्यांच्या काही खास आठवणी सांगितल्या आहेत. (Aadesh and Suchitra Bandekar Emotional)

यावेळी अधिपती-अक्षरा यांनी आदेश बांदेकरांना सूचित्रा बांदेकरांबरोबरचा लग्नातील एक जुना फोटो दाखवण्यात आला. या फोटोवर आदेश बांडेकरांनी व्यक्त होत असं म्हटलं की, “विश्वास… कारण खिशात काही नव्हतं आणि पुढे काय होणार हे काहीच माहीत नव्हतं. तेव्हा सूचित्राने माझ्यावर विश्वास ठेवून लग्न केलं. हा फोटो बोरिवलीच्या आमच्या वन रुमच्या हॉलमध्ये काढलेला फोटो आहे. घराच्या बाहेर एक छोटासा लग्नाचा विधी करण्यात आला होता. तेव्हाचा हा फोटो आहे. हा लग्नसोहळा आज इतक्या वर्षांनंतर पाहताना एखाद्या मोठ्या राजमहालातील लग्नापेक्षाही दिमाखदार पद्धतीने झाल्यासारखा मला वाटतो”.

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

आणखी वाचा – Bigg Boss च्या घरात सूरजला हवी आहे मैत्रीण, ‘बिग बॉस’ने विचारताच लाजला, म्हणाला, “साडी नेसणारी…”

यापुढे अक्षराने सूचित्रा यांना त्यांच्या भावना विचारल्या. त्याबद्दल सूचित्रा असं म्हणाल्या की, “आता या क्षणी मीही भावुक झाले आहे. पण मला वाटतं आपण एखादी गोष्ट अगदी मनापासून करतो. तेव्हा वास्तू किंवा देव आपल्याला तथास्तु म्हणत असतो. तसच माझं आदेशच्या बाबतीत झालं. प्रत्येकवेळी आदेशने जे काही काम असले ते इतकं मनापासून केलं की, त्यामुळे त्याला ते यश मिळालं. आजवरचा आदेशचा प्रवास बघून मला छान वाटत आहे, कारण आदेशने कधीच कोणत्याच गोष्टीचा आळस केला नाही किंवा कोणत्याही गोष्टीचा गैरफायदा घेतला नाही. त्याच्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक स्त्रीला आणि कामाला त्याने आदर दिला. त्याचं फलित म्हणून आज तो आज इथे बसला आहे”.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : “कभी कपडे फाडे, कभी बात बाप तक गई”, रॅपमधून आर्याने निक्कीचा खरा चेहरा आणला समोर, म्हणाली, “तेरा कर्मा…”

दरम्यान, ‘दार उघड बये… दार उघड…’ अशी हाक साधारण २० वर्षांपूर्वी ऐकू आली आणि पैठणीचा खेळ रंगायला सुरुवात झाली. आदेश बांदेकर यांच्या ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमाचा पहिला भाग १३ सप्टेंबर २००४  मध्ये भेटीला आला होता. आदेश बांदेकर ते लाडके भावोजी हा प्रवास साधारण २० वर्षांचा प्रवास प्रत्येकासाठी खासच आहे. पण आता हा प्रवास शेवटाला अखेर २० वर्षांनी आदेश भावोजींनी गृहिणींचा निरोप घेतला आहे.

Tags: Aadesh and Suchitra Bandekar EmotionalAadesh Bandekarsuchitra bandekar
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Next Post
Bigg Boss Marathi 5 daily updates

Bigg Boss Marathi मधील नॉमिनेशन टास्कमध्ये टीम A बाद, 'हे' सदस्य झाले थेट नॉमिनेट, कोण जाणार घराबाहेर?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.