बॉलिवूड अभिनेत्री मलायका आरोरा सध्या खूप चर्चेत आली आहे. तिच्या वडिलांनी राहत्या घराच्या इमारतीच्या छतावरुन उडी मारुन आत्महत्या केली आहे. ही बातमी वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली. यानंतर बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी तिचे सांत्वन करण्यासाठी घरी हजेरी लावली आहे. मलायकाचा पूर्वाश्रमीचा पती अरबाज खान, मुलगा अरहान, पूर्वाश्रमीचे सासू-सासरे सलीम खान, सलमा खान, सोहेल खानदेखील पोहोचले होते. त्याचप्रमाणे तिचा बॉयफ्रेंड अर्जुन कपूरदेखील तिथे उपस्थित असलेला दिसून आला. अशातच आता अभिनेत्रीचया वडिलांनी आत्महत्या का केली? असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. (malaika arora father)
मलायकाचे वडील अनिल आरोरा यांच्या मृत्यूने सगळ्यांनाच धक्का बसला आहे. मुंबई पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. पोलिसांना त्यांच्या मृतदेहापाशी कोणतीही चिट्ठि मिळाली नाही. त्यांचा मृतदेह आता रुग्णालायत ठेवण्यात आला आहे. अनिल यांचा जन्म पंजाब येथील फजिल्कामध्ये झाला होता. पंजाबी कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झाला होता. ते 9 इंडियन नेव्हीमध्ये काम करायचे. त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचे झाले तर ते जॉयस पॉलिकार्प यांच्याशी झाले होते. त्या ख्रिश्चन कुटुंबातून आल्या होत्या. जॉयस व अनिल यांचे लग्न फार काळ टिकू शकले नाही. मलायका जेव्हा 11 वर्षांची होती तेव्हाच त्यांनी घटस्फोट घेतला.
मलायकाचा जन्म 23 ऑक्टोबर 1973 रोजी झाला तर त्यांची दुसरी मुलगी आणि मलायकाची लहान बहीण अमृताचा जन्म 31 जानेवारी १९८१ रोजी झाला. अमृतादेखील बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रीपैकी एक आहे. दरम्यान मलायकाने १९९८ साली अरबाज खानबरोबर लग्न केले. त्यांना अरहान नावाचा मुलगादेखील आहे. मात्र त्यांचे लग्नदेखील टिकू शकले नाही. २०१९ साली त्यांनीदेखील घटस्फोट घेतला आणि वेगळे झाले.
तसेच लहान मुलगी अमृतादेखील अभिनेत्री असून २००२ साली तिने अभिनय करण्यास सुरुवात केली. ४ मार्च २००९ साली तिने शकील लदाकबरोबर लग्न केले. त्यांचे लग्न मुस्लिम व ख्रिश्चन पद्धतीने झाले. त्यांना रेयान व अजान अशी दोन मुलं आहेत.