Malaika Arora Father Died : अभिनेत्री मलायका अरोराचे वडील अनिल अरोरा यांच्या निधनाची बातमी समोर आली आहे. अभिनेत्रीच्या वडिलांचे बुधवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास निधन झाले. मलायका अरोराच्या वडिलांनी इमारतीच्या छतावरुन उडी मारुन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. वडिलांच्या मृत्यूनंतर मलायकाच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मलायकाच्या वडिलांच्या निधनाची बातमी समजल्यानंतर तिचा पुर्वाश्रमीचा पती अरबाज खान या कठीण काळात तिला आधार देण्यासाठी तिच्या घरी सर्वप्रथम पोहोचला.
सकाळीच अरबाज खान मलायकाच्या घराबाहेर दिसला. अरबाज खान मलायकाच्या घराबाहेर पोलिसांशी आणि फोनवर बोलताना दिसला. अनिल अरोरा यांच्या निधनाने मलायका व तिच्या कुटुंबीयांना धक्का बसला आहे. अशा कठीण परिस्थितीत अरबाज खानची उपस्थिती पाहायला मिळाली. मलायकाचे वडील अनिल यांचे निधन झाले तेव्हा ती पुण्यात होती. वडिलांच्या निधनाची बातमी समजताच ती पुण्याहून मुंबईला यायला रवाना झाली. सध्या मलायकाच्या वडिलांचा मृतदेह बाबा हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आला आहे. अभिनेत्रीच्या वडिलांनी वांद्रे येथील घराच्या तिसऱ्या मजल्यावरुन आत्महत्या केली.
आणखी वाचा – मलायका अरोराच्या वडिलांचे निधन, छतावरुन उडी घेत केली आत्महत्या, कारण अद्याप अस्पष्ट
मलायका व अरबाजने १९९८ मध्ये लग्न केल्याची माहिती आहे. त्यांनी प्रेमविवाह केला होता. दोघांचे लग्न तब्बल १९ वर्षे टिकले. या लग्नापासून तिला एक मुलगा अरहान आहे. आता मलायका व अरबाज एकत्र नाहीत. २०१७ मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. पण दोघेही अनेकदा त्यांच्या मुलाबरोबर एकत्र स्पॉट झाले आहेत. मलायका व अरबाज त्यांच्या आयुष्यात आलेल्या कठीण काळात एकत्र आहेत.
आणखी वाचा – “नॉमिनेशचा त्रास होतोय”, वर्षा ताईंबरोबर निक्कीचं भांडण होताच नेटकरी भडकले, म्हणाले, “घराबाहेर…”
मलायका व अरबाज त्यांचे लग्न संपल्यानंतर आपापल्या आयुष्यात मार्गी लागले. अरबाजने शुरा खानशी लग्न केले आहे. मलायकाही तिच्या आयुष्यात पुढे गेली आहे. ती अर्जुन कपूरसह रिलेशनशिपमध्ये होती, आता दोघांच्या ब्रेकअपच्या बातम्या चर्चेत आहेत.