गुरूवार, एप्रिल 16, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अखेर प्रतीक्षा संपली! ‘दहावी-अ’ वेबसीरिज ‘या’ तारखेला प्रेक्षकांच्या भेटीला येणार, उत्सुकता वाढली

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 4, 2025 | 12:41 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Itsmajja upcoming new web series Dahavi-A will be released from January 06 Monday

‘दहावी-अ’ सीरिज ‘या’ दिवसापासून प्रेक्षकांच्या भेटीला, तुम्ही उत्सुक आहात का?

‘इट्स मज्जा’च्या ‘आठवी-अ’ या सीरिजला प्रेक्षकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळाला होता. डोंगरावरच्या एका छोट्याश्या खेडेगावातून हायस्कुलसाठी परगावी येणाऱ्या आभ्या व त्यांच्या खास मित्रांची साधी तरी प्रत्येकाला आपलीशी वाटणारी गोष्ट या सीरिजद्वारे दाखवण्यात आली होती. या सीरिजने अनेक दिवस प्रेक्षकांचे चांगलेच लक्ष वेधून घेतले होते. त्यामुळे या सीरिजमध्ये येणाऱ्या अनेक ट्विस्ट्स व रंजक वळणांमुळे सीरिजच्या प्रत्येक भागासाठी प्रेक्षक आतुर असायचे. पण अखेर २५ भागांनंतर या सीरिजने प्रेक्षकांचा निरोप घेतला. मात्र या सीरिजच्या निरोपाबरोबरच ‘इट्स मज्जा’ने ‘दहावी-अ’ या सीरिजची घोषणा केली होती. तेव्हापासून अनेकांना ‘दहावी-अ’ची उत्सुकता लागून राहिली होती. (Dahavi-A Series first episode)

अशातच आता सर्वांसाठी एक खुशखबर आहे, ती म्हणजे ‘दहावी-अ’ ही सीरिज अखेर प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झाली आहे. अनेकजण या सीरिजची आतुरतेने वाट बघत होते आणि प्रेक्षकांची ही उत्सुकता अखेर संपली आहे. ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीस यायला अवघे काही दोन दिवस उरले आहेत. ‘दहावी-अ’ ही ‘इट्स मज्जा’ची आगामी नवीन वेबसीरिज येत्या ६ जानेवारीपासून म्हणजेच सोमवारपासून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. दर सोमवारी व गुरुवारी दुपारी १.३० वाजता ‘इट्स मज्जा’च्या युट्यूब चॅनेलवर प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

View this post on Instagram

A post shared by Majja (@its.majja)

आणखी वाचा – अभिषेक-ऐश्वर्या पुन्हा दिसले एकत्र, नव्या वर्षाचे सेलिब्रेशन करुन भारतात परतले, ‘त्या’ कृतीने वेधलं लक्ष

२६ डिसेंबर रोजी शाहू कला मंदिर, सातारा येथे ‘दहावी-अ’चा भव्य ट्रेलर लाँच सोहळा पार पडला. ‘इट्स मज्जा’चे शौरीन दत्ता, अंकिता लोखंडे, सीरिज दिग्दर्शक व मुख्य कलाकारांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. समस्त सातारकर आणि अनेक प्रेक्षकांनी या भव्य ट्रेलर लाँच सोहळ्याला हजेरी लावली होती. शाळेचं दहावीचे वर्ष हे कायमच सर्वांसाठी खास असते. शाळेत घालवलेल्या प्रत्येक खास आठवणींची शिदोरी घेऊन अनेकजण आपल्या नव्या आयुष्याला सुरुवात करतो. याच आठवणींचं भावविश्व ‘दहावी-अ’ सीरिजमधून पाहता येणार आहे.

आणखी वाचा – चालू नाटकात शरद पोंक्षे सर्वकाही विसरल्याच्या ‘त्या’ व्हिडीओवर सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची भावुक प्रतिक्रिया, म्हणाली, “जे काही झालं ते…”

दरम्यान, ‘आठवी-अ’च्या भरघोस यशानंतर आता ‘इट्स मज्जा’ आणि ‘मीडिया वन सोल्यूशन्स’ ‘दहावी-अ’ ही वेबसीरिज घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे आता या आगामी सीरिजमध्ये प्रेक्षकांना काय नवीन पाहायला मिळणार? या सीरिजमधून आता आणखी कोणती नवीन कथा दिसणार? आभ्या आणि त्याच्या खास मित्रांची ही नवीन गोष्ट कोणत्या आणखी नवीन वळणावर पोहोचणार? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना या सीरिजमधून मिळणार आहेत.

Tags: Dahavi-A Series first episodeDahavi-A Series first episode Marathi NewsItsmajja Original Dahavi-A Series Marathi News
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Sonali Kulkarni latest post
Entertainment

विमानात रडणाऱ्या बाळाच्या कानाखाली मारली आणि…; आईच्या ‘त्या’ कृतीवर भडकली मराठी अभिनेत्री, सांगितला धक्कादायक प्रसंग

एप्रिल 16, 2026 | 1:22 pm
Akshay Kumar fitness :
Lifestyle

‘या’ बॉलिवूड अभिनेत्याने १५ वर्षांपासून खाल्ला नाहीय समोसा, वयाच्या ५९ व्या वर्षी आहे इतका फिट, कारण आहे…

एप्रिल 16, 2026 | 11:00 am
Reasons For Sugar Cravings 
Lifestyle

जेवणानंतर आपल्याला मिठाई का हवी असते?, आयुर्वेदात दडलंय याचं रहस्य, वाचा सविस्तर

एप्रिल 16, 2026 | 10:10 am
Rakhi Sawant and Raqesh Bapat bonding
Entertainment

“मला माझा संसार हवाय”, राकेश बापटच्या एकतर्फी प्रेमात आहे राखी, म्हणाली, “मी बॉलिवूड सोडेन”

एप्रिल 15, 2026 | 4:38 pm
Next Post
Sunita Ahuja On Govinda

"माणूस सरड्यासारखा रंग बदलतो आणि…", पत्नी सुनीता आहुजाच्या बोलण्याने गोविंदा नाराज, काय आहे भांडणाचे कारण?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.