गुरूवार, एप्रिल 16, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

करिश्मा कपूर आणि संजय कपूर यांचं झालेलं अरेंज-मॅरेज, लग्नाबाबत अभिनेत्री म्हणालेली, “माझ्या आई-वडिलांचा निर्णय…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 19, 2025 | 3:30 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Karisma -Sunjay Arrange Marriage

करिश्मा कपूर आणि संजय कपूर यांचं झालेलं अरेंज-मॅरेज, लग्नाबाबत अभिनेत्री म्हणालेली, "माझ्या आई-वडिलांचा निर्णय…"

Karisma -Sunjay Arrange Marriage : इंग्लंडच्या विंडसरमध्ये पोलो खेळत असताना करिश्मा कपूरचे पूर्वाश्रमीचे पती संजय कपूर यांचे १२ जून २०२५ रोजी निधन झाले. संजय कपूरच्या मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे म्हटले जात आहे. सामन्यादरम्यान, त्याने चुकून एक मधमाशी गिळंकृत केली, ज्यामुळे गंभीर एलर्जी त्यांना झाली आणि त्याचवेळी श्वास कोंडल्याने हृदयविकाराचा झटका आला. घटनास्थळी वैद्यकीय मदत असूनही, त्यांना वाचवता आले नाही. अखेर आज सात दिवसांनी दिल्ली येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. निधनावेळी संजय लंडनमध्ये होते, त्यामुळे काही कागदी व्यवहारामुळे त्यांचे पार्थिव मुंबईत आणण्यात त्यांना उशीर झाला. आज संजय यांच्यावर अंत्यसंस्कार होणार असून करिष्मा तिच्या दोन्ही मुलांसह दिल्लीला रवाना झाली आहे.

करिश्मा कपूर हिने २९ सप्टेंबर २००३ रोजी मुंबई येथे संजय कपूरबरोबर शाही थाटामाटात लग्नगाठ बांधली. त्यांचे हे लग्न अरेंज मॅरेज पद्धतीने करण्यात आले आणि करिश्मा आणि तिचे वडील रणधीर कपूर यांनी त्यावेळी सुरुवातीच्या मुलाखती दरम्यान याची पुष्टी केली. लग्नाबद्दल विचारले असता रणधीर कपूर यांनी यू रेडिफला सांगितले, “आम्ही तुम्हाला काही दिवसांत तारीख सांगू शकू. लग्नाचा निर्णय घेण्यात आला आहे. करिश्मा आणि संजय दोघेही एकमेकांना ओळखतात, परंतु मित्रांच्या मदतीने लग्नाचा निर्णय घेण्यात आला आहे”. करिश्मा तिच्या वतीने म्हणाली, “माझे पालक माझ्यासाठी निर्णय घेतील तो अखेरचा असेल.”

आणखी वाचा – हैद्राबादमधील रामोजी फिल्म सिटीमध्ये भुताटकी, काजोलचा मोठा दावा, म्हणाली, “देवाच्या कृपेने मला…”

तथापि, करिश्मा आणि संजय यांचे लग्न काही वर्षात तुटले. या जोडीला मुलगी समायरा आणि मुलगा कियान अशी दोन मुलेही आहेत. करिश्मा आणि संजय यांचे लग्न कटुतेने भरलेले होते. अभिनेत्रीने हनीमूनच्या वेळीही तिच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप अभिनेत्रीने केला होता आणि तिचा व्यवहार केल्याचा आरोप केला होता. दुसरीकडे, संजयने असा दावा केला की करिश्माने केवळ त्याच्या संपत्तीसाठीच लग्न केले होते. या जोडीच्या घटस्फोटाची प्रक्रिया बर्‍याच वर्षांपासून सुरु होती. शेवटी २०१६ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. बॉलिवूडमधील सर्वात वाईट ब्रेकअप म्हणून या जोडीचे नाव नोंदवले गेले.

आणखी वाचा – “फक्त प्रसिद्धी व नाव हवंय आणि…”, चर्चेत राहण्यासाठी गोविंदाच्या पत्नीची धडपड, म्हणाली, “आडनाव काढलं कारण…”

करिश्मापासून घटस्फोटानंतर संजय कपूरने प्रिया सचदेवशी लग्न केले. प्रियाचे विक्रम चतवालशी लग्न झाले होते आणि तिला एक मुलगी सफिरा चतवाल आहे, तर २०१८ मध्ये संजय आणि प्रिया यांनी एका मुलाचे म्हणजेच अझारियसचे स्वागत केले.

Tags: bollywood gossipentertainmentkarishma kapoor wedding
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Rakhi Sawant and Raqesh Bapat bonding
Entertainment

“मला माझा संसार हवाय”, राकेश बापटच्या एकतर्फी प्रेमात आहे राखी, म्हणाली, “मी बॉलिवूड सोडेन”

एप्रिल 15, 2026 | 4:38 pm
Rakhi Sawant Interview
Entertainment

वडिलांचा विरोध, छोटे कपडे घालून आयटम साँग आणि…; Dramaqueen राखी सावंतचा स्ट्रगल, म्हणाली, “कोणाचा बाप बसलाय…”

एप्रिल 15, 2026 | 1:26 pm
Bobby Deol alcohol quit
Entertainment

“कुटुंबातील सदस्य घाबरले”, दीड वर्षांपासून दारूपासून दूर राहिलाय बॉलिवूड अभिनेता, लवकर थकायचा आणि…

एप्रिल 15, 2026 | 11:49 am
rakhi sawant desinger dress
Entertainment

‘बिग बॉस मराठी’च्या फिनालेसाठी १२ लाखाचा ड्रेस, राखी सावंतची जय्यत तयारी, दुबईला जाऊन…

एप्रिल 15, 2026 | 11:08 am
Next Post
ashvini bhave daughter graduate ceremony

कॅलिफोर्निया विद्यापिठातून अश्विनी भावेंची लेक झाली पदवीधर, फोटो शेअर करत केलं कौतुक, अभिनंदनाचा वर्षाव

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.