शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“फक्त प्रसिद्धी व नाव हवंय आणि…”, चर्चेत राहण्यासाठी गोविंदाच्या पत्नीची धडपड, म्हणाली, “आडनाव काढलं कारण…”

Majja Webdeskby Majja Webdesk
जून 19, 2025 | 12:30 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Govinda wife remove surname

“फक्त प्रसिद्धी व नाव हवंय आणि...”, चर्चेत राहण्यासाठी गोविंदाच्या पत्नीची धडपड, म्हणाली, “आडनाव काढलं कारण...”

गेल्या काही दिवसांपासून गोविंदाची पत्नी सुनीता अहुजा चांगलीच चर्चेत आहे. गोविंदाच्या पडत्या काळात पत्नीने त्याला खंबीर साथ दिली. गेली काही वर्ष तर तो इंडस्ट्रीपासून दूरच आहे. मात्र आता त्याच्या अपयशाबबात सुनीता प्रत्येक मुलाखतीत खुलेपणाने बोलत आहे. इतकंच काय तर गोविंदा व सुनिताच्या घटस्फोटाच्या चर्चांनीही जोर धरला आहे. मात्र सध्यातरी दोघं एकत्र असल्याचं सुनीताने स्पष्टपणे सांगितलं. यासगळ्यामध्ये गोविंदा कुठे कमी पडतो?, त्याच्या चुका नेमक्या काय आहेत? हे सुनीता प्रसारमाध्यमांसमोर सातत्याने बोलत आहे. त्यामुळे दोघांच्या नात्यामध्ये दुरावा आला आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. अशातच आता सुनीताने आणखी एक मुद्दा उकरुन काढला आहे. (Govinda wife remove surname)

सुनीताने सोशल मीडियावर तिचं नावंही बदललं. याचबाबतही अनेक चर्चा सुरु झाल्या. इटाइम्सला दिलेल्या मुलाखतीत तिला नाव हटवण्याबाबत विचारण्यात आलं. सुनीताने अहुजा आडनाव काढून एक S जोडला. यावर ती म्हणाली, “मी अहुजा आडनाव काढून टाकलं. त्यानंतर माझ्या नावामध्ये आणखी एक S जोडला. पण हा बदल जवळपास वर्षभरापूर्वीच झाला आहे”.

आणखी वाचा – Video : वडिलांचं पार्थिव पाहताच ढसाढसा रडू लागली मन्नारा चोप्रा, मन हेलावून टाकणारा व्हिडीओ समोर

View this post on Instagram

A post shared by Ssunita (@officialsunitaahuja)

पुढे ती म्हणाली, “न्युमरोलॉजी नुसार हा बदल मी केला आहे. मला नाव आणि प्रसिद्धी हवी आहे. मला सांगा हे सगळं कोणाला नको हवं असतं?”. सुनीताने अगदी स्पष्ट शब्दांमध्ये नाव बदलण्यामागची भावना आणि तिचे विचार सांगितले. नाव बदललं पण त्यानंतर सगळं काही हवं तसं घडत असल्याचं सुनीता यांचं म्हणणं आहे. कित्येक महिने सुनीता सतत चर्चेतच आहे. शिवाय वारंवार ती प्रसारमाध्यमांना मुलाखतीही देत आहे. यामागे प्रसिद्धी हा एकमेव तिचा उद्देश आहे.

आणखी वाचा – “सातासमुद्रापार ४५ वर्षं राहूनही…”, परदेशात मराठी गृहस्थाला भेटून संकर्षण कऱ्हाडे भावुक, म्हणाला, “निघतांना घट्ट मिठी मारली…”

नाव बदलल्यानंतर तुम्हाला प्रसिद्धी मिळाली का? असा प्रश्नही विचारण्यात आला. तेव्हा सुनीता म्हणाली, “हो प्रसिद्धी मिळाली. गेल्या काही महिन्यांपासून मी किती व्हायरल होता आहे हे तुम्ही बघतच आहात. संपूर्ण इंटरनेटवर फक्त माझीच चर्चा आहे. पण मी अहुजा आहेच. मी जेव्हा या जगामधून जाईन तेव्हाच हे आडनाव संपेल”. गोविंदाबाबत घटस्फोटाच्या चर्चांवर ती म्हणाली, “आम्ही एक सुखी कुटुंब आहोत. जोपर्यंत आमच्या दोघांकडून काहीच बोललं जात नाही तोपर्यंत कोणतेच अंदाज लावण्यात अर्थ नाही”. प्रसिद्धीसाठी सुनीता वारंवार मुलाखती आणि विविध मतं मांडत असल्याचं यामधून स्पष्ट झालं आहे.

Tags: bollywood newsentertainment newsgovinda
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Next Post
kajol calls ramoji film city haunted

हैद्राबादमधील रामोजी फिल्म सिटीमध्ये भुताटकी, काजोलचा मोठा दावा, म्हणाली, “देवाच्या कृपेने मला...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.