बुधवार, सप्टेंबर 9, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

कॅलिफोर्निया विद्यापिठातून अश्विनी भावेंची लेक झाली पदवीधर, फोटो शेअर करत केलं कौतुक, अभिनंदनाचा वर्षाव

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 19, 2025 | 5:01 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
ashvini bhave daughter graduate ceremony

कॅलिफोर्निया विद्यापिठातून अश्विनी भावेंची लेक झाली पदवीधर, फोटो शेअर करत केलं कौतुक, अभिनंदनाचा वर्षाव

शाळा, कॉलेज, नोकरी, करिअरमध्ये मुलांची गगनभरारी त्यांच्या पालकांना भारावून टाकणारी असते. मुलांना यशस्वी होताना बघून आई-वडिलांना काही वेगळाच आनंद होतो. प्रत्येक यशाच्या पायरीवर पालकांचाही तितकाच खारीचा वाटा असतो. मुलांची शिक्षणात प्रगती आणि त्यांचं यश सर्वसामान्य पालकांप्रमाणेच सेलिब्रिटी मंडळीही सेलिब्रेट करतात. व्यग्र वेळापत्रकामधून जमेल तितका वेळ काढत मुलांच्या प्रत्येक यशामध्ये सहभाग घेतात. असंच काहीसं आता सुप्रसिद्ध अभिनेत्री अश्विनी भावे यांच्याबाबत घडलं आहे. अश्विनी यांनी लेकीबरोबरचा फोटो शेअर करत सगळ्यांना आनंदाची बातमी दिली आहे. (ashvini bhave daughter graduate ceremony)

अश्विनी यांनी करिअर करत असताना कुटुंबालाही तितकंच प्राधान्य दिलं. किशोर बोपर्डीकर यांच्याशी लग्न झाल्यानंतर त्या अमेरिकेमध्ये स्थायिक झाल्या. त्यांनी संसार, कुटुंब, मुलांना सांभाळत त्यांच्या अभिनयाची आवड पूर्ण केली. आता त्यांनी आयुष्यातील एक सुवर्ण क्षण अनुभवला आहे. अश्विनी यांची मुलगी साची पदवीधर झाली आहे. याचदरम्यानचे काही फोटो आणि पोस्ट त्यांनी सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर केली आहे.

आणखी वाचा – “फक्त प्रसिद्धी व नाव हवंय आणि…”, चर्चेत राहण्यासाठी गोविंदाच्या पत्नीची धडपड, म्हणाली, “आडनाव काढलं कारण…”

View this post on Instagram

A post shared by Ashvini Bhave (@ashvinibhave)

अश्विनी यांनी पोस्ट शेअर करत लेकीचं कौतुकही केलं. त्या म्हणाल्या, “अभिनंदन माय डियर. ABC पासून सुरु झालेला प्रवास आज इथवर पोहोचला आहे. आम्हा दोघांना तुझा खूप अभिमान आहे. हा आनंद शब्दांमध्ये व्यक्त करता न येणारा आहे”. अश्विनी यांनी मोजक्याच शब्दांमध्ये लेकीचं भरभरुन कौतुक केलं. तसेच त्यांच्या या पोस्टवर अनेक सेलिब्रिटी मंडळींनी कमेंट करत अभिनंदनाचा वर्षाव केला.

आणखी वाचा – करिश्मा कपूर आणि संजय कपूर यांचं झालेलं अरेंज-मॅरेज, लग्नाबाबत अभिनेत्री म्हणालेली, “माझ्या आई-वडिलांचा निर्णय…”

लॉस एंजेलिसमधील कॅलिफोर्निया विद्यापिठातून साची पदवीधर झाली आहे. अश्विनी यांच्या लेकीने बायोमेडिकल रिसर्चमध्ये तिचं शिक्षण उत्तमरित्या पूर्ण केलं. लेकीला अभिमानाने जवळ घेत अश्विनी यांनी फोटोसाठी सुंदर पोझ दिल्या. फोटो पाहून अभिनेत्रींनीही कमेंट केल्या आहेत. खूप खूप अभिनंद, साचीच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा, कुटुंबासाठी अभिमानाचा क्षण, साचीच्या पालकांना तिचा खूप अभिमान आहे अशा विविध कमेंट्स अनेकांनी केल्या आहेत.

Tags: ashvini bhaveashvini bhave daughtermarathi actress
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bandhkhor Marathi Movie
Entertainment

सहा स्त्रियांच्या बंडाची कहाणी उलगडणार ‘बंडखोर’मधून, सुनेत्रा अजित पवार आणि सुनील गावस्कर यांच्या उपस्थितीत ट्रेलर प्रदर्शित

सप्टेंबर 8, 2026 | 1:48 pm
Suraj Chavan Baby
Entertainment

सूरजच्या बाळाला भेटायला गेली, हॉस्पिटलमध्ये मिठाई वाटली अन्…; जान्हवीच्या ‘त्या’ व्हिडीओचं होतंय कौतुक

सप्टेंबर 8, 2026 | 12:19 pm
Bandkhor Marathi Movie Poster Release
Entertainment

चेहऱ्यावर करारी भाव… मनात बंडाची ठिणगी! ‘बंडखोर’च्या पोस्टरने वेधलं लक्ष

सप्टेंबर 7, 2026 | 11:25 am
Suraj Chavan Baby
Entertainment

सूरज चव्हाण झाला बाबा, घरी आली गोड परी, लग्नाच्या वर्षभरातच दिली गुडन्यूज

सप्टेंबर 5, 2026 | 11:03 am
Next Post
Karisma Kapoor abhishek Bachchan Engagement

साखरपुडा होऊनही अभिषेक बच्चन व करिश्मा कपूर यांचं लग्न का मोडलं?, अमिताभ बच्चन यांनी सांगितलेलं कारण, म्हणाले…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.