बुधवार, एप्रिल 22, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘सूर नवा ध्यास नवा’मधून स्पृहा जोशीची एक्झिट! ‘ही’ अभिनेत्री दिसणार सूत्रसंचालिकेच्या भूमिकेत, नेटकरी नाराज, म्हणाले, “गुणी सूत्रसंचालिका…”

Kshitij Lokhandeby Kshitij Lokhande
ऑक्टोबर 3, 2023 | 10:42 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Sur Nava Dhyas Nava new Anchor

'सूर नवा ध्यास नवा'मधून स्पृहा जोशीची एक्झिट! 'ही' अभिनेत्री दिसणार सूत्रसंचालिकेच्या भूमिकेत

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अशा ‘सूर नवा ध्यास नवा’ कार्यक्रमाचे आतापर्यंत पाच पर्व झाले असून लवकरच या कार्यक्रमाचा सहावं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कार्यक्रमाच्या आतापर्यंतच्या सर्व पर्वांना रसिक प्रेक्षकांचे प्रेम मिळाले आहे. त्याचबरोबर, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन याची विशेष ओळख बनली आहे. अभिनेत्री स्पृहा जोशीने आपल्या खुमासदार सूत्रसंचालनाने कार्यक्रमाची अनेक पर्व गाजवली आहे. केवळ स्पृहासाठी हा कार्यक्रम बघायचो, अशी प्रतिक्रिया त्यांचे चाहते द्यायचे. मात्र, आता यंदाच्या पर्वात स्पृहा आपल्याला सूत्रसंचालन करताना दिसणार नाही. (Sur Nava Dhyas Nava new Anchor)

‘सुर नवा ध्यास नवा’चा पहिला प्रोमो काही दिवसांपूर्वीच समोर आला होता. ज्यात गायक अवधूत गुप्ते आणि महेश काळे हे परीक्षकाच्या भूमिकेत दिसणार असल्याचे समोर आले होते. आता या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालिकेचं नाव समोर आलं असून अभिनेत्री रसिका सुनील यंदाच्या पर्वाचे सूत्रसंचालन करताना दिसणार आहे. त्याची घोषणा नुकतीच ‘ढोलकीच्या तालावर’ कार्यक्रमाच्या महाअंतिम सोहळ्यात करण्यात आली.

हे देखील वाचा – “भारत को छेडोगे तो…”, कंगना रणौतच्या ‘तेजस’ चित्रपटाचा धमाकेदार टीझर प्रदर्शित

कलर्स मराठीच्या ऑफिशियल इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून ज्यामध्ये रसिकाची ओळख करण्यात आली आहे. दरम्यान, हा व्हिडिओ समोर येताच रसिकाच्या चाहत्यांनी स्वागत केले. मात्र, स्पृहाचे चाहते नाराज झाले असून कमेंटद्वारे त्यांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे. “स्पृहासारखी गुणी सूत्रसंचालिका असताना तिला बदलण्याची काय गरज होती?”, असा प्रश्न एका नेटकऱ्याने केला. तर “आम्हाला स्पृहाच हवी”, अशी कमेंट एकाने केली. अनेक नेटकऱ्यांनी स्पृहाच सर्वोत्तम असल्याचे कमेंटमध्ये म्हटलं आहे.

हे देखील वाचा – “स्वतःची तयारी असल्याशिवाय… “, घराची स्वप्न पाहणाऱ्या मुलींना ऋतुजा बागवेचा मोलाचा सल्ला, म्हणाली, “आपली माणसं जेव्हा…”

View this post on Instagram

A post shared by @colorsmarathi

‘सूर नवा ध्यास नवा – आवाज तरूणाईचा’ हे नवे पर्व येत्या ७ ऑक्टोबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘जुनं ते सोनं असतं पण नवंही हवं असतं…’ अशी थीम असणाऱ्या या नव्या पर्वात प्रेक्षकांना नक्की काय पाहायला मिळणार, याची उत्सुकता लागली आहे.

Tags: colors marathirasika sunilreality showspruha joshisur nava dhyas nava
Kshitij Lokhande

Kshitij Lokhande

Latest Post

veen doghatli hi tutena serial
Entertainment

भयंकर ऊन, घामाच्या धारा अन्…; ‘वीण दोघांतली…’च्या कलाकारांनी ४५ मिनिटांत पूर्ण केलं शूट, बहरणार रोमान्स

एप्रिल 22, 2026 | 2:50 pm
Puja Banerjee pregnant
Entertainment

टेलिव्हिजनची ‘पार्वती’ दुस-यांदा प्रेग्नंट, पळून जाऊन वयाच्या १५व्या वर्षी केलेलं लग्न, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

एप्रिल 22, 2026 | 1:00 pm
Aishwarya Rai updates
Entertainment

“आई ती शेवटी आईच”, एअरपोर्टवर लेकीला घ्यायला पोहोचले ऐश्वर्या-अभिषेक, आराध्याचे फोटोही काढले आणि….

एप्रिल 22, 2026 | 11:00 am
Deepali Sayed Home Coming
Entertainment

घरापासून लांब, मानसिक ताण आणि…; १०० दिवसांनी घरी परतताच दीपाली सय्यदच जंगी स्वागत, म्हणाली, “उंबरठ्यावर…”

एप्रिल 22, 2026 | 9:55 am
Next Post
Mahesh jadhav won gold medal

“शाळेत उंचीमुळे...”, ‘लागीरं झालं जी’ फेम अभिनेत्याची पोस्ट चर्चेत; म्हणाला, “हे सुवर्णपदक घेऊन...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.