बॉलिवूड अभिनेत्रींमध्ये वाद –विवाद असल्याचे अनेक वर्षांपासून पाहायला मिळाले आहेत. आता कंगना रणौत व आलिया भट्ट यांच्यामध्ये वाद असलेले दिसून येत आहे. ही सुरुवात खुद्द कंगनाने केली असून याबाबत आता अजून काही खुलासे झाले. नुकताच कंगनाने राजकारणात प्रवेश केला असून तिला लोकसभा २०२४ साठी हिमाचल येथील मंडी येथून भाजप पक्षाकडून उमेदवारीचे तिकीट मिळाले. सध्या ती प्रचारामध्ये व्यस्त आहे. आशातच तिचा सोशल मीडियावर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. हा व्हिडीओ पाहून तिने पुन्हा एकदा आलियावर निशाणा साधल्याचे दिसून येत आहे. (kangana ranaut on alia bhatt )
कंगनाने ‘टाइम्स नाऊ’च्या समिटमध्ये कॉँग्रेस नेता राहुल गांधी यांच्या विचारांबद्दलही भाष्य केले आहे. ती म्हणाली की, “मी त्यांना तसेच पाहते जसे काही फिल्म जगतातील ‘राजा बेटा’च. जसे तिथे मुलीला अवॉर्ड दिले. मला पण आता अवॉर्ड हवे आहेत. आता सगळे अवॉर्ड त्यांना द्या. नाराज आहेत ते. सर्व अवॉर्ड त्यांना द्या. ते सध्या यावरुन नाराज आहेत”.
तसेच त्यानंतर राजकराणातील प्रवेशावर कोणत्या बॉलिवूड कलाकरांनी शुभेच्छा दिल्या?” , असे विचारले. त्यावर ती म्हणाली की, “असे नाही आहे. बॉलिवूडमधील सगळेजण माझ्यासाठी खुश आहेत. आम्ही राष्ट्रवादी लोक आहोत. त्यामुळे १० ते १५ वर्ष आधीच सुरुवात करतो. पण जे ‘नेपो माफिया’ आहेत त्यांच्यासाठी खास सेट अप आहे. ते लोक आम्हाला पुढे येऊ देत नाहीत”.
याआधीही कंगनाने आलियावर अनेक आरोप केले आहेत. जेव्हा तिचं ‘गली बॉय’ हा चित्रपट प्रदर्शित झालं तेव्हा आलियाचे नाव ने घेता कंगणाने तिला ‘सामान्य अभिनेत्री’ व ‘बिंबो’ असे संबोधले होते. पण ‘गंगूबाई काठियावाडी’ हा चित्रपट पाहिल्यानंतर तिने आलियाची प्रशंसादेखील केली होती. या चित्रपटासाठी आलियाला २०२३ साली सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता.
कंगनाच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर ती ‘तेजस’ या चित्रपटामध्ये दिसून आली होती. आता तिचा ‘इमर्जन्सी’ हा चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी तयार आहे. याचित्रपटात ती भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. हा चित्रपट १४ जून २०२४ साली प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.