Bigg Boss Marathi 5 : बिग बॉस मराठीचा रविवारचा भाऊचा धक्का चांगलाच गाजला. रितेशने सर्वांची शाळा घेतलीच पण त्यानंतर त्याने सर्वाणशी आगळेवेगळे टास्क खेळत मजामस्तीही केली. निक्की-अरबाजमध्ये पुन्हा एकदा पॅचअप झालं आणि दुसरीकडे त्यांच्या गेमबद्दलही चर्चा रंगली. धक्का सुरू झाल्यानंतर जोडीमध्ये लावलेले बेल्ट रितेश सोडण्याचे आदेश देतो. याशिवाय घन:श्याम दरवडेशी रितेशने धरलेला अबोलाही सोडला. रितेशने शॉकचा टास्क खेळला, त्याचबरोबर सर्व जोड्यांचे डान्सही बघितले. त्यानंतर स्पर्धकांचे सोशल मीडियावर व्हायरल मिम्सही दाखवले. (Bigg Boss Marathi 5 New Promo)
त्यानंतर सर्वांना मोठा धक्का दिला तो म्हणजे एलिमिनेशनचा. रितेश सांगतो की सर्वाधिक मतं अभिजीतला, त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर मतं निक्कीला असून तिसऱ्या स्थानी वर्षा आहे. मग रितेश सांगतो की, अंकिता घरातून एलिमिनेट झाली आहे. अंकिताचं एव्हिक्शन सर्वांसाठी धक्कादायक असतं. ती घरातून पाटी घेऊन निघते, मुख्यद्वारही उघडलं जातं. डीपी, सूरज अक्षरश: ढसाढसा रडतात. जेव्हा दार उघडतं तेव्हा खरं सरप्राइज मिळतं, त्याठिकाणी असे लिहिलेले असते, ‘इतरांना पाण्यात पाहण्यापेक्षा स्वत: चांगलं खेळा, अपेक्षा आहेत. या आठवड्यात तुम्ही सेफ आहात.’
आणखी वाचा – Bigg Boss Marathi मधून ‘कोकण हार्टेड गर्ल’ अंकिता प्रभू वालावलकरची एक्झिट, धनंजय व सूरजला अश्रु अनावर
अशातच आजच्या बिग बॉस च्या नवीन प्रोमोमध्येही प्रेक्षकांची एकमेकांबरोबरची मजामस्ती पाहायला मिळत आहे. नुकत्याच आलेल्या या नवीन प्रोमोमध्ये सूरज, जान्हवी व धनंजय हे तिघे अरबाज निक्की व वैभवची नक्कल करत आहेत. यामध्ये सूरज अरबाजची, जान्हवी निक्कीची व धनंजय वैभवची नक्कल करतानाचे पाहायला मिळत आहे. गेल्या आठडव्यात अरबाजने आक्रमक होऊन घरात राडा केला होता. त्याचीच नक्कल हे तिघे करतानाचे या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.
या नवीन प्रोमोत सूरज एका दुचाकीवर बसलेला असताना धनंजय तिथे येतो आणि म्हणतो सूरज अरबाज आणि मी वैभव आहे. तेवढ्यात तिथे जान्हवी येते आणि तो ‘निक्की त्याला त्रास होतोय, त्याच्या जवळ जाऊ नको” असं म्हणत आहे. तर सूरज त्याला साथ देत अरबाजची नक्कल करत असे म्हणत आहे की, “तिला जायला सांगा माझं डोकं दुखतंय” त्यानंतर धनंजयही वैभवची नक्कल करत “हा निक्कीचा डाव आहे” असं म्हणत त्याची नक्कल करतो. यावर अरबाज व निक्कीदेखील हसू लागतात. एकूणच गेल्या आठडव्यातील रुसवे फुगवे या आठडव्यात संपल्याचे या प्रोमोमधून दिसून येत आहे. आता हे किती दिवस कायम राहणार हे पाहणे रंजक ठरणार आहे.