बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री कंगना रणौत ही नेहमी चर्चेत आहे. राजकारणामध्ये प्रवेश केल्याने खूप प्रकाशझोतात आली आहे. बॉलिमध्ये नाव कमावल्यानंतर तिने राजकरणात प्रवेश केला. हिमाचल प्रदेश येथील मंडी या भागातून ती उमेदवार म्हणून उभी होती. तिला जनतेने भरगोस मतं देऊन विजयीदेखील केले. निवडून आल्यानंतर देखील ती अनेक कारणांमुळे चर्चेत राहिली. अशातच आता तिचा एक नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘इमर्जन्सी’ असे नवीन चित्रपटाचे नाव असून यामध्ये ती माजी पंतप्रधान स्वर्गवासी इंदिरा गांधी यांच्या भूमिकेमध्ये दिसणार आहे. (kangana ranaut property)
काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर यावरुन वादविवाद झालेलेदेखील पाहायला मिळाले. ६ सप्टेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. मात्र प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली गेली. या चित्रपटामुळे कंगनाला जीवे मारण्याच्या धमक्यादेखील मिळू लागल्या होत्या. याबद्दल तिने सोशल मीडियावर भीतीदेखील व्यक्त केली होती. अशातच आता तिच्याबद्दलची एक नवीन अपडेट समोर आली आहे.
कंगनाच्या चित्रपटाचे वाद सुरु असतानाच तिच्या पाली हिल येथील बंगला विकला आहे. याबद्दलची माहिती कागदपत्रांमुळे समोर आली आहे. अभिनेत्रीने हा बंगला ३२ कोटी रुपयांना विकला आहे. तिचा बंगला खूप वादात सापडला होता. २०१७ साली ही मालमत्ता तिने २०.७ कोटी रुपयांना खरेदी केली होती. डिसेंबरमध्ये या मालमत्तेवर तिने बँकेकडून २७ कोटी रुपयांचं कर्जदेखील घेतले होते. या बंगल्याचा वापर तिने प्रॉडक्शन हाऊस, मनिकर्णिका चित्रपटासाठी केले होते.
हा बंगला विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे एका युट्यूब चॅनलच्या माध्यमातून समोर आले होते. हा बंगला ३,०७५ स्क्वेअर फुट क्षेत्रफळामध्ये आहे. या घरासाठी १.९२ कोटी रुपयांची स्टॅम्प ड्यूटीदेखील भरली होती. तसेच ३० हजार रुपये नोंदणी शुल्कदेखील भरले होते. मात्र २०२० साली बीएमसीने हा बंगला अवैध असल्याचे सांगत याचा काही भाग पाडला होता.तसेच ९ सप्टेंबर रोजी मुंबई उच्च न्यायालयाने स्टे आणल्यानंतर पाडण्याचे काम थांबवले.