‘बिग बॉस मराठी’च्या घरात सध्या तुफान राडे सुरु असलेले पाहायला मिळत आहेत. यंदाच्या या पर्वात स्पर्धक मंडळी एकापेक्षा वरचढ ठरत धुमाकूळ घालताना दिसत आहेत. अशातच ‘बिग बॉस मराठी’च्या घरात वाईल्ड कार्ड स्पर्धकांची एण्ट्री झालेली पाहायला मिळाली. वाईल्ड कार्ड स्पर्धकाच्या एण्ट्रीने घरातील सर्वच स्पर्धक खूप खुश असलेले दिसले. अशातच ‘बिग बॉस’च्या घरात संग्राम चौगुलेची वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून एण्ट्री झालेली दिसली. संग्राम चौगुले घरात आल्याने तो काय रणनीती आखणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. (Bigg Boss Marathi Season 5)
संग्रामने पहिल्याच दिवशी स्पर्धकांना सडेतोड उत्तर दिल्याने स्पर्धकांचे धाबे दणाणले. वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून प्रवेश केलेल्या संग्रामने ‘बिग बॉस’च्या घरात येताच रंग दाखवायला सुरुवात केली आहे. पहिल्याच दिवशी पहिल्याच टास्कमध्ये संग्रामने निक्की तांबोळीला तिची जागा दाखवली. इतके दिवस निक्कीचा अरेरावीपणा ‘बिग बॉस’च्या घरात सुरु होता आता मात्र तिला उत्तर द्यायला, तिच्या विरोधात लढायला संग्रामची एण्ट्री झालेली पाहायला मिळाली.
आता यानंतर समोर आलेल्या प्रोमोमध्ये संग्राम व सूरज एकत्र काम करताना दिसत आहेत. संग्राम चौगुलेने वाईल्ड कार्ड एण्ट्री घेतली तेव्हा सर्व सदस्यांची भेट घेतली. यावेळी संग्राम सूरजला तुझ्यासाठीच आलोय असं म्हणत मिठी मारताना दिसला. एकूणच संग्राम व सूरज यांची आता ‘बिग बॉस’च्या घरात मैत्री झालेली पाहायला मिळत आहे. समोर आलेल्या प्रोमोमध्ये, संग्राम व सूरज एकत्र येत गेम प्लॅनबद्दल बोलताना दिसत आहेत.
आणखी वाचा – दीपिका-रणवीर झाले आई-बाबा, बाळाला आशीर्वाद देण्यासाठी स्वतः मुकेश अंबानी पोहोचले रुग्णालयात, व्हिडीओ समोर
सूरज म्हणतो, आपण यांना गेममध्ये हरवून टाकू. हादरले पाहिजे”. यावर संग्राम म्हणतो, “त्या दिवशी जे समोर तसं वागायचं. तोवर कोणाला हरवायचं नाही, कोणाला काही करायचं नाही. आपल्याकडून काही चुका होणार नाहीत हे बघायचं”. यावर सूरज म्हणतो, “नाही. मी आधी सगळ्यांना विचारतो हे बरोबर आहे की नाही”. यावर संग्राम म्हणतो, “मी पण सगळ्यांना विचारतो”. यावर सूरज म्हणतो, “तुला तितकं ज्ञान आहे. आणि तुला सर्व समजतं. मी कॉलेजला गेलो नाही म्हणून मला तेवढं ज्ञान नाही. मी शिकलो असतो तर माझी बुद्धी चांगली चालली असते”. यावर संग्राम म्हणतो, “बुद्धी चालवायला सूरज शिकायची गरज नसते. रोजच्या रोज सुरु आहे तितकंच ऐकलं ना तरी पुरे असतं”.