बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. कंगनाने आजवर अनेक चित्रपटांमधून महत्त्वपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनात घर केलं. सध्या कंगना तिच्या आगामी ‘इमर्जन्सी’ चित्रपटासाठी सज्ज झाली असल्याचं पाहायला मिळत आहे. अभिनेत्री, खासदार कंगना रनौत सध्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटासाठी जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे. मात्र, आता या चित्रपटाचे प्रदर्शन धोक्यात आल्याचे दिसत आहे. अलीकडेच अभिनेत्रीने ‘आप की अदालत’ या शोमध्ये सहभाग घेतला, जिथे तिने तिच्या लग्नासाठी आगामी नातेसंबंधांबद्दल आश्चर्यकारक खुलासा केला. (Kangana Ranaut On Wedding)
या शोमध्ये कंगनाने सांगितले की तिला योग्य जोडीदार सापडत नाही आहे त्यामुळे लग्न करण्यास विलंब होत आहे. अभिनेत्रीने सांगितले की, “जेव्हा तिच्या भावी सासरच्या लोकांना कळले की पोलिसांनी तिला बोलावले आहे, तेव्हा त्यांनी तिथून पळ काढला. यानंतर कंगनाने ती मस्करी करत असल्याचे स्पष्ट केले”.
शोमधील कोणीतरी तिला लग्नाबद्दलचे विचार विचारले असता अभिनेत्रीने अतिशय सुंदर उत्तर दिले. कंगना म्हणाली, “हे बघ, माझ्या मनात लग्नाबद्दल खूप चांगले विचार आहेत. मला वाटतं की मला मुलं झाली पाहिजेत, पण आता लोकांनी मला इतका राग दिला आहे की ते मला लग्न करु देत नाहीत”. ‘आप की अदालत’ या शोमध्ये कंगनाने तिच्यावर अनेक कोर्ट केसेस असल्याचेही उघड केले. शेतकऱ्यांच्या आंदोलनावर केलेल्या टिप्पण्या, जावेद अख्तर यांच्याशी झालेल्या वादाबाबत केलेल्या टिप्पण्यांसह काही बाबींवर त्यांच्यावर न्यायालयीन खटले सुरु असल्याचं तिने सांगितलं.
या प्रकरणी अभिनेत्री म्हणाली, “माझ्याकडे इतके कोर्ट केसेस आहेत की जेव्हाही मी कोणाशी बोलू लागते तेव्हा पोलिस माझ्या घरी येतात आणि समन्स येतात. एकदा माझे भावी सासरची मंडळी माझ्या घरी आले होते आणि त्याचवेळी मला समन्स आला ते पाहून ते पळून गेले. आणि हे एक कलाकार असण्याचे नुकसान आहे”, असेही कंगना म्हणाली.