बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत ही अनेकदा तिच्या बेधडक व्यक्तव्यांमुळे अधिक चर्चेत असते. यावरुन तिचे अनेकदा वादही होताना दिसतात. सध्या तिने अभिनयाकडून राजकारणाकडे वळलेली दिसत आहे. तिला भाजपकडून हिमाचल प्रदेश येथील मंडी येथून उमेदवारीचे तिकीट मिळाले आहे. अशातच आता तिने गोमांस खाल्ल्याबद्दलचे ट्विट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यावर स्वतः कंगनाने मौन सोडले असून त्याबद्दलचे स्पष्टीकरण दिले आहे. पण यातील नेमकी खरी बाजू कोणती आहे याबद्दल मोठे प्रश्नचिन्ह प्रेक्षकांसमोर उपस्थित होत आहे. हे नक्की काय प्रकरण आहे ते जाणून घेऊया. (kangana ranaut viral post )
कंगनाबद्दल सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अफवा सुरु आहेत. तिने नुकत्याच केलेल्या ट्विटमध्ये यावर स्वतःची बाजू मांडली आहे. तिने आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, “मी गोमांस किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या मांसाचे सेवन करत नाही. माझ्याबद्दल उगाचच अफवा पसरवल्या जात आहेत. मी योगा व आयुर्वेदिक पद्धतींचा प्रचार व प्रसार करत आहे. माझी प्रतिमा खराब होईल अशी कोणतीही रणनीती वापरु नका. माझी माणसं मला ओळखतात. मी एक हिंदू आहे आणि कोणत्याही अफवांचा परिणाम होणार नाही, जय श्रीराम”.
I don’t consume beef or any other kind of red meat, it is shameful that completely baseless rumours are being spread about me, I have been advocating and promoting yogic and Ayurvedic way of life for decades now such tactics won’t work to tarnish my image. My people know me and…
— Kangana Ranaut (Modi Ka Parivar) (@KanganaTeam) April 8, 2024
दरम्यान कंगनाच्या या ट्विटवर एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया देत एक स्क्रीनशॉट शेअर केला आहे. यामध्ये कंगनाने लिहिले होते की, “बीफ खाण्यात काय वाइट आहे? हे कोणताही धर्माशी निगडीत नाही आहे. तसेच स्वतः गेल्या आठ वर्षांपासून शाकाहारी आहे हे सर्वांनाच माहीत आहे आणि योगी होण्याचा पर्याय निवडला आहे. तसेच कोणत्याही एका धर्मावर विश्वास ठेवत नाही”.
Was this you or your body double? Or perhaps Hrithik did this to you 💀 pic.twitter.com/xh5aLFQJnL
— Ankit Mayank (@mr_mayank) April 8, 2024
कंगनाने नुकताच राजकारणात प्रवेश केला आहे. येत्या निवडणुकीमध्ये तिची जोरदार तयारी सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. यासाठी कंगनाने एक रोड शो आयोजित केला होता. तसेच याबरोबर तिने चित्रपटसृष्टीतील स्वतःच्या प्रवासाबद्दलदेखील सांगताना म्हणाली की, “चित्रपटसृष्टीतील माझा प्रवास सोपा नव्हता. इंग्रजी भाषेयरुन ट्रोलही करण्यात आले होते”.
तिच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर ती आता ‘इमर्जन्सी’ या चित्रपटामध्ये माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटाचे तिने दिग्दर्शनही केले आहे.