शनिवार, जुलै 25, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“मुन्ना भय्या साकारताना माझी घुसमट…”, ‘मिर्झापुर’ फेम दिव्येंदु शर्माचं भाष्य चर्चेत, म्हणाला, “त्याचा परिणाम झाला कारण…”

Majja Webdeskby Majja Webdesk
एप्रिल 8, 2024 | 4:39 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
divyendu sharma on mirzapur webseries

“मुन्ना भय्या साकारताना माझी घुसमट...”, 'मिर्झापुर' फेम दिव्येंदु शर्माचं भाष्य चर्चेत, म्हणाला, “त्याचा परिणाम झाला कारण...”

ओटीटीवरील सर्वात लोकप्रिय वेबसिरीज ‘मिर्झापुर’ला प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली. या सिरिजमधील सर्वच भूमिकांना प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले. या सिरिजचे आतापर्यंत दोन भाग प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. यातील कालीन भय्या, मुन्ना भय्या, बाऊजी, गुड्डू पंडित, बिना त्रिपाठी, गजगामिनी गुप्ता,बबलू पंडित या भूमिकांना प्रेक्षकांचे विशेष प्रेम मिळाले. पण आता या भूमिकांमध्ये काहीसे बदल झालेले आपल्याला पाहायला मिळणार आहे. या सिरिजचा तिसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यानिमित्ताने ‘मुन्ना भय्या’च्या भूमिकेत असणारा दिव्येंदु शर्मा बद्दल नवीन अपडेट समोर आली आहे.  (divyendu sharma on mirzapur webseries)

‘मिर्झापुर ३’मध्ये सर्वांचा लाडका असणाऱ्या मुन्ना भय्याची व्यक्तीरेखा सकारणारा दिव्येंदु शर्मा या भागात दिसणार नाही. यांचा खुलासा स्वतः दिव्येंदुने केला आहे. नवीन भागात तो तिसऱ्या भागात दिसणार नाही असे सांगितले आहे.

आणखी वाचा – Video : मॅक्सी घालून हातात बाळ अन् आता…; ऐश्वर्या नारकरांनी स्वतःलाच म्हटलं संतूर मम्मा, रुपही बदललं, नेटकरीही म्हणाल्या, “संतूर आजीही…”

View this post on Instagram

A post shared by Divyenndu ???? (@divyenndu)

नुकताच दिव्येंदुने ह्युमन्स ऑफ बॉम्बेला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले की, “मी मिर्झापुरच्या तिसऱ्या भागात दिसणार नाही हे मी स्वतः घोषित करत आहे”. त्याच्या या विधानानंतर दुसऱ्या भागामध्ये त्याचा मृत्यू झाला आहे असं स्पष्ट होत आहे. त्याच्या भूमिकेबद्दलही तो व्यक्त झाला आहे. मुन्ना भय्या साकारल्यानंतर त्याची नेमकी काय परिस्थिति झाली होती याचा खुलासादेखील त्याने केला आहे.

आणखी वाचा – महिन्याला फक्त १० हजार रुपयांची कमाई करणाऱ्या ट्रान्सवुमनचं नशीब चमकलं, एकता कपूरच्या चित्रपटात करणार काम

या बद्दल तो म्हणाला की, “माझ्यासाठी ‘मुन्ना भय्या’ ही भूमिका साकारणे खूप कठीण होते. हा एक जबरदस्त भूमिका आहे हे मला सुरुवातीला वाटलं. तसेच मी आधी ‘बबलू पंडित’च्या भूमिकेसाठी ऑडिशन दिली होती. पण काही दिवसांनंतर मी मुन्ना भय्याच्या भूमिकेसाठी अधिक साजेसा आहे असं वाटलं”.

पुढे तो म्हणाला की, “जेव्हा मी ही भूमिका करत होतो तेव्हा माझ्या व्यक्तिमत्त्वावर खूप खोलवर परिणाम झाला. कोणत्याही भूमिकेमध्ये खोलवर जाऊ नये. ही भूमिका करणे हे माझ्यासाठी खूप कठीण जात होतं. तसेच ही भूमिका करताना मला कधी कधी घुसमट व्हायची. तसेच होई भूमिका केल्यानंतर तुम्ही किती गडद अंधारात जात आहात हे समजून येते”.

मिर्झापुरचा पहिला सीझन २०१८ साली प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. यामध्ये पंकज त्रिपाठी, विक्रांत मेस्सी, अली फजल, कुलभूषण खरबंदा, दिव्येंदु शर्मा, रसिका दुग्गल, श्वेता त्रिपाठी असे अनेक कलाकार मुख्य भूमिकेमध्ये दिसले होते. त्यानंतर २०२० साली दुसरा सीझन आला. आता प्रेक्षक तिसऱ्या सीझनची आतुरतेने वाट पाहत आहेत.      

Tags: divyendu sharmamirzapur season 3ottwebseries
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Pach Futacha Bachchan Marathi Movie
Entertainment

‘पाच फुटाचा बच्चन’ चा दैदीप्यमान प्रवास : कीर्तन, संस्कृती आणि संघर्षाची प्रेरणादायी कथा

जुलै 25, 2026 | 2:00 pm
Shekhar Suman On Student Protest
Entertainment

तीन दिवस झोप नाही, रडत आहे आणि…; आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जमुळे प्रसिद्ध अभिनेत्याला दुःख, म्हणाला…

जुलै 25, 2026 | 12:45 pm
Eva grover husband hyder ali khan
Entertainment

दिग्दर्शकासह शरीरसंबंध ठेवण्यास जबरदस्ती आणि…; नवऱ्याबाबत सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, म्हणाली, “पैशांसाठी…”

जुलै 25, 2026 | 11:00 am
Akanksha Chamola Gaurav Khanna Lock Upp 2
Entertainment

Lock Upp 2 : गौरव खन्नाची कुत्र्याशी तुलना करणं पत्नीला पडलं भारी, नेटकरी भडकले, म्हणाले, “घटस्फोट दे…”

जुलै 25, 2026 | 9:50 am
Next Post
Mugdha vaishampayan and Prathamesh Laghate

आंबे विकणार म्हणून अनेकांनी हिणवलं, आता नवऱ्याची व्यवसायात होणारी प्रगती पाहून मुग्धा वैशंपायन भारावली, म्हणाली, "गुढीपाडव्यासाठी…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.