बॉलीवूड अभिनेत्री सध्या खूप चर्चेत आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये तिने हिमाचल प्रदेशमधील मंडी या भागातून विजय मिळवला आहे. तिला मिळालेल्या विजयाने सर्वांनीच तिला शुभेच्छा दिल्या आहेत. बॉलीवूडमधून तिने राजकारणात प्रवेश केला आणि पहिल्याच प्रयत्नात तिला जननेते स्वीकारले. मनोरंजन क्षेत्र तसेच इतर क्षेत्रातून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अशातच ६ जून रोजी घडलेल्या घटनेने कंगना अधिककच प्रकाशझोतात आली. चंदीगढ एअरपोर्टवर CISF महिला कॉन्स्टेबलने कंगनाच्या कानशिलात लगावल्याची चर्चा सुरु झाली. या सर्व प्रकारामुळे महिला कॉन्स्टेबलवर कारवाई करण्याची मागणी होऊ लागली. (Rangoli chandel on kangana ranaut)
चंदीगढमध्ये घडलेल्या प्रकारावर कंगना सोशल मीडियावर भाष्य केले असून तिच्याबरोबर घडलेली आपबीती सांगितली आहे. सदर महिला कॉन्स्टेबलने पंजाब शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ हे कृत्य केल्याचे सांगितले. यावर आता कंगनाची बहिण रंगोलीने या प्रकरणात उडी घेतली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला कंगनाचा व्हिडीओ शेअर करत ती म्हणाली की, “खलिस्तान्यांनो हीच लायकी आहे तुमची. मागून सगळ्या योजना आखायच्या आणि हल्ले करायचे. पण माझी बहीण धीट आहे.

पुढे ती म्हणाली की, “तिला तुम्ही झुकावू शकत नाही. ती या परिस्थितीला बरोबर हाताळेल. पण आता पंजाबचं काय होणार? शतकऱ्यांचा आंदोलनाचा खलिस्तान्यांनी वापर केला. पुन्हा एकदा हे सिद्ध झालं आहे. खर तर ही सुरक्षेची चूक आहे. हे असं व्हायला नाही पाहिजे होतं. आपण सर्वांनी या विरोधात आवाज उठवला पाहिजे”. रंगोलीच्या या भाष्यावर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत.
चंदीगढ एअरपोर्टवर घडलेल्या प्रकरणावर कॉन्स्टेबलची प्रतिक्रियादेखील समोर आली आहे. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये ती म्हणाली आहे की, “कंगनाने एकदा सांगितले होते की शंभर रुपये घेऊन आंदोलनात महिला सहभागी झाल्या आहेत. त्यावेळी माझी आईदेखील आंदोलनात सहभागी झाली होती”. तसेच कंगनाने देखील सांगितले की, “जेव्हा बोर्डिंगसाठी मी गेले तेव्हा तेव्हा CISF कॉन्स्टेबलने मला शिव्या दिल्या आणि कानशिलात लागावली”. कुलविंदर कौर असे कॉन्स्टेबलचे नाव असून तिचा पतीदेखील CISF जवान आहे. त्यांना दोन मुलंदेखील आहेत.