स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ ही मालिका सध्या प्रेक्षकांचे चांगलेच लक्ष वेधून घेत आहे. मालिकेत नुकतीच अर्जुनने साक्षीविरोधातली केस जिंकली असल्यामुळे आनंदी वातावरण आहे तर दुसरीकडे सायली-अर्जुन यांच्यातील प्रेम बहर्तनाचे पाहायला मिळत आहे. त्यांची केमिस्ट्री चाहत्यांच्या विशेष पसंतीस पडत आहे. त्यांना बाळ हवे असून ते दोघे बाळाचे अनेक स्वप्ने रंगवत आहेत. त्यामुळे प्रेक्षकांनाही सायली व अर्जुन खरंच आई-बाबा होणार का याची उत्सुकता लागून राहिली आहे. तर एकीकडे प्रिया म्हणजेच तन्वीची नवी चालही मालिकेत पहायला मिळत आहे.
मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की, सायली व अर्जुन आपलं बाळ मुलगा असेल की मुलगी आणि ते पुढे जाऊन नक्की कोण होणार? यावर चर्चा रंगवतात. शेवटी दोघे आपण असे कसे एकदम बोलून गेलो या विचारात स्वतःशीच लाजतात. दुसरीकडे प्रिया म्हणजेच तन्वी प्रतिमासाठी खोटं रडण्याचे नाटक करते. रविराज प्रतिमाबद्दल स्वतःला दोषी मानतो आणि नागराज रविराजबद्दल, असाच तू यात अडकून आश्रम केसमध्ये अजिबात पडू नकोस असं मनात म्हणतो. एकीकडे महीपत जेलमधून साक्षीला फोन करून मोबाईलबद्दल अजून कोणाला माहिती असल्याचं विचारतो, चैतन्यचाही विषय काढतो. त्यावर साक्षी उलट चैतन्यने कोर्टात पूर्णपणे आपल्या बाजूने केस लढल्याचं महीपतला सांगते. तरीही महीपत चैतन्यवर बारीक लक्ष ठेवून साक्षीला सावध व्हायला सांगतो.
आणखी वाचा – ‘पारू’ फेम कलाकारांच्या ‘त्या’ डान्सवर रश्मिका मंदानाही फिदा, व्हिडीओवर कमेंट करत म्हणाली…
इथे रविराज पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवायला बोलावले असल्याचं सांगतो. “मी जाऊन येतो तोवर तुम्ही ती प्रतिमा नसण्यासाठी प्रार्थना करा” असंही पुढे रविराज सांगतो. त्यावर नागराजसुद्धा त्याच्याबरोबर येण्याचे सांगतो. त्यानंतर तन्वी म्हणजेच प्रियाही रविराजकडे त्याच्याबरोबर यायचा हट्ट करते. दुसरीकडे सायली आपण एखादा विषय ताणू तेवढा वाढतो असं अर्जुनला सांगते. आपण बोलताना अगदी वहावत गेलो असल्याचंसुद्धा सायली अर्जुनला सांगते. पण आपला बाळाचा तूर्तास काही विचार नाही असं आपण कल्पनाला सांगू असं अर्जुन त्यावर म्हणतो.
दुसरीकडे साखरपुड्याच्याचे फोटो मागण्याच्या बहाण्याने चैतन्य साक्षीच्या मोबाईलचा अनलॉक पिन बघून घेतो. इथे अर्जुन सायलीला आपण घरच्या सगळ्यांना आपलं बाळाचे तसे काही प्लॅनिंग नाही असं सांगूया असं सांगतो. सायली काहीही झालं तरी कल्पनाचा बाळाच्या विचाराचा गैरसमज दूर करायलाच हवा असं ठरवते. त्यानंतर चैतन्य गॅसवर काहीतरी जळत आहे, असं सांगून साक्षीला किचनमध्ये पाठवतो आणि तेवढ्यात महिपतच नंबर तिच्या मोबाईलमध्ये शोधू लागतो, पण इतक्यात साक्षी परत येते आणि “तुला फोटो हवा होता ना” असं चैतन्यला विचारते. त्यावरून साक्षीला महिपतला आलेला चैतन्याचा संशय खरा तर नाही ना, हा विचार करते.