झी मराठीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ ही मालिका अनेक नवनवीन ट्विस्ट्समुळे प्रेक्षकांचे चांगलेच लक्ष वेधून घेत आहे. मालिकेत रुपालीच्या वशमधून सगळे बाहेर आल्यानंतर नेत्राच्या आई होणार असल्याचा एक नवीन ट्विस्ट आला असल्याचे पाहायला मिळाले. मालिकेत नेत्राने नुकतीच आई होणार असल्याची खुशखबर दिली आहे. त्यामुळे राजाध्यक्षांच्या घरी सध्या आनंदाचं वातावरण आहे. अशातच मालिकेच्या कालच्या भागात विरोचक जीवंत कसा असा प्रश्न पडला आहे.
विरोचकाचा गळा चिरण्यात आला, कड्यावरुन् खाली टाकण्यात आले. तयासेच कट्यारीनेदेखील त्याला मारण्यात आले. पण तरीही विरोचक जीवंत कसा? असा प्रश्न राजाध्यक्ष कुटुंबियांना पडला आहे. यानंतर इंद्राणी विरोचक जीवंत कसा हे शोधण्यासाठी वावोशी गावाकडे जातात. यादरम्यान, नेत्रा देवी आईकडे “माझी काय चूक झाली?, मला माफ कर, मला महित नाही माझ्याकडून काय चूक झाली?, पण मला याविरुष लढण्यासाठी शक्ती दे. पण याची शिक्षा माझ्या कुटुंबाला देऊ नका” अशी प्रार्थना करते.
यानंतर केतकी काकू नेत्राला असं म्हणतात की, विरोचक मेला आहे मात्र रुपाली जीवंत आहे. रुपालीच्या शरीरातील विरोचक मेला असला तरी रुपाली म्हात्रे जीवंत आहे आणि ती आता विरोचकाच्या वधाचा बदला घेणार. इतक्यात अद्वैतला एक फोन येतो. त्यानंतर तो नेत्रासह लगेच हॉस्पिटलमध्ये जातात. हॉस्पिटलमध्ये पोहोचताच ते दोघे रुपालीला हॉस्पिटमध्ये बेडवर बघतात आणि तिला तिथे बसून दोघांनाही धक्काच बसतो. यावेळी पोलिस रुपालीने नदीत उडी मारून जीव देण्याचा प्रयत्न केल्याचे सांगतात. मात्र तिच्या नाशिबामुळे तिला तिथल्या लोकांनी वाचवले आणि इथे अॅमिट केल्याचे सांगतात.
आणखी वाचा – ‘पारू’ फेम कलाकारांच्या ‘त्या’ डान्सवर रश्मिका मंदानाही फिदा, व्हिडीओवर कमेंट करत म्हणाली…
यानंतर रुपालीला जाग येते तेव्हा ती नेत्रा व अद्वैतला बघत त्यांच्याकडे बघूनण भावुक होते. रुपालीवर उपचार करणारे डॉक्टर हे शेखर राजाध्यक्षांचे मित्र असलीने ते तिच्यावर उपाचर करतात. शिवाय ते डॉक्टर नेत्रा व अद्वैत यांना पुण्यात राजाध्यक्षांची ओळख असल्यामुळे त्यांनी हे सगळं प्रकरण घरच्या घरीच निस्तारावे असा सल्लाही देतात.