सध्या बॉलिवूड व पंजाबी गायक दिलजीत दोसांज खूप चर्चेत आला आहे. संपूर्ण भारतात त्याने ‘दिलूमिनाती’ कॉन्सर्ट आयोजित केले होते. नुकताच त्याचा मुंबई येथे एक कॉन्सर्ट पार पडला. दरम्यान या वेळी त्याच्या कॉन्सर्टवरुन मोठ्या प्रमाणात चर्चादेखील होताना दिसून आली. आंध्रप्रदेश, पंजाब, तेलंगणा, राजस्थान व महाराष्ट्रातील कॉन्सर्टमध्ये दारु व ड्रग्ज यासंबंधित गाण्यांवर बंदी आणली गेली. यामुळे मोठा वाददेखील निर्माण झाला. अशातच आता या सगळ्या प्रकरणात अभिनेत्री कंगना रणौतने भाष्य केले आहे. आजवर कंगना व दिलजीत यांच्यामध्ये वाद असलेले दिसून आले. मात्र आता कंगनाने दिलजीतला पाठिंबा देत भाष्य केलेले दिसून येत आहे. कंगना नक्की काय म्हणाली? हे जाणून घेऊया. (kangana ranaut on diljit dosanjh)
कोणत्या नियमांचे पालन केले जात नाही? याबद्दल कंगनाने भाष्य केले आहे. ती म्हणाली की, “गाण्यांमधून तुम्ही प्रत्येक गोष्ट काढून टाकाल. चित्रपटांमधून प्रत्येक गोष्ट काढाल. पण असे अनेक राज्यांमध्ये दारु बंद आहे पण खरच तिथे दारु मिळत नाही का? जर इतक्या साऱ्या गोष्टी अवैध असतील तर त्या गोष्टी अवैध नाहीत का?”.
पुढे ती म्हणाली की, “किती आपघातांचे व्हिडीओ समोर आले आहेत. त्या ठिकाणी हे नियम कोण पाळतं? मला हे म्हणायचं आहे की ही लोकांची जबाबदारी नाही का?”, कंगनाचे हे वक्तव्य अधिक चर्चेत आले आहे. दरम्यान या आधी १४ डिसेंबर रोजी चंदीगडमध्ये कॉन्सर्ट करण्याआधी त्याला नोटिस पाठवण्यात आली होती. यामध्ये दारुचे समर्थन असणारे एकही गाणे गाऊ नये. तसेच लहान मुलांना मंचावर घेऊन जाता येणार नाही असेही सांगण्यात आले होते.
भारतातील दिलजीत दोसांझच्या म्युझिक कॉन्सर्टमध्ये चाहत्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. पंजाबी सुपरस्टारने दिल्लीहून आपल्या दिल लुमिनाटी टूरची शानदार सुरुवात केली होती. यानंतर त्याने जयपूर, हैदराबाद, अहमदाबाद, लखनौ, पुणे, कोलकाता आणि बेंगळुरू, मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या कॉन्सर्टला चाहत्यांनी खूप पसंती दर्शवली आहे.