अभिनेत्री रिद्धी डोगरा ही टेलिव्हिजनचा एक लोकप्रिय आणि प्रसिद्ध चेहरा आहे. तिने केवळ मालिकाच नव्हे तर अनेक हिट सीरिज व चित्रपटांमधूनही प्रेक्षकांचे मनोरंजन केलं आहे. नुकतीच ती ‘जवान’ व ‘साबरमती रिपोर्ट’सारख्या चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली. आपल्या अभिनयाने चर्चेत राहणारी ही अभिनेत्री अनेकदा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत आली आहे. अशातच तिने एका मुलाखतीत तिच्या राकेश बापटबरोबरच्या नात्यावर भाष्य केलं आहे. रिद्धीचं २०११ साली अभिनेता राकेश बापटबरोबर लग्न झालं होतं. मात्र लग्नाच्या ८ वर्षांनी त्यांचा घटस्फोट झाला. पण घटस्फोटानंतरही राकेश बापटबरोबर मैत्री असल्याचं तिने नुकतंच म्हटलं आहे. (Riddhi Dogra on her divorce with Raqesh Bapat)
अभिनेता राकेश बापट सध्या ‘नवरी मिळे हिटलरला’ या मराठी मालिकेत ‘एजें’ची भूमिका साकारत आहे. या भूमिकेमुळे तो मराठी प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय झाला आहे. तर दुसरीकडे रिद्धी हिंदी चित्रपटांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. अशातच तिने नुकतीच ‘पिंकव्हिला’ला मुलाखत दिली. यात असं म्हटलं की, “सहसा मी माझ्या समस्या स्वतःजवळच ठेवते. पण मला जर कोणाच्या पाठिंब्याची गरज असेल, तेव्हा अनेक लोक माझ्यासाठी उभे असतात. तसंच माझा भाऊ अक्षय डोगराही मला पाठिंबा देतो. मी टेन्शनमध्ये असताना काय करायचं हे त्याला चांगलं माहित आहे. तसंच काही मित्रही आहेत ज्यांच्याकडून मी सल्ला घेते”.
आणखी वाचा – एकीकडे अप्पी-अर्जुनचे लग्न, तर दुसरीकडे अमोलची आयुष्याशी झुंज, ‘अप्पी आमची कलेक्टर’ मालिका निर्णायक वळणावर
पुढे तिने राकेश बापटविषयी म्हटलं की, “मला निराशाजनक वाटतं तेव्हा मी एकता कपूरकडेही जाते. माझे जुने शाळेतले मित्रही माझी साथ देतात. इतकंच नाही तर राकेश माझा पूर्वाश्रमीचा पती असला तरी तोही मला कायमच पाठिंबा देतो. आमचा भलेही घटस्फोट झाला असेल, पण जेव्हा मी कोणत्या समस्येत असते तेव्हा मी त्याच्याकडून सल्ला घेते. तो माझा आजही खूप जवळचा मित्र आहे”.
आणखी वाचा – कंगणा रणौतचा दिलजित दोसांझला फुल्ल सपोर्ट, दारु-सिगारेटच्या गाण्यांवर अभिनेत्री म्हणाली, “लोकांची जबाबदारी…”
दरम्यान, राकेश बापट हा नवरी मिळे हिटलरला या मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील त्याची लीलाबरोबरची केमिस्ट्री प्रेक्षकांना चांगलीच भावत आहे. मालिकेत दाखविल्याप्रमाणे लीला व एजे यांच्यात चांगली मैत्री आहे. लीला एजेच्या प्रेमात पडली आहे. तिने तिचे प्रेम व्यक्त केले आहे. मात्र, तिला स्पष्टपणे एजेने सांगितले की, त्याचे त्याच्या पहिल्या पत्नीवर अंतरावर प्रेम आहे. तो तिला विसरू शकत नाही.