‘वेलकम’ फेम अभिनेते मुश्ताक खान यांचे २० नोव्हेंबरला अपहरण झाले होते. एका कार्यक्रमाच्या बहाण्याने बोलावून त्याचे अपहरण केल्याचे अभिनेत्याने म्हटलं होतं. आता याबाबत स्वत: अभिनेत्याने काही खुलासे केले आहेत. ही भयानक घटना कशी आणि कधी घडली?, याबाबत अभिनेत्याने आता पत्रकार परिषदेत सांगितलं आहे. यावेळी त्यांनी संपूर्ण घटनेचा तपशीलवार खुलासा केला आहे. मुश्ताक खान यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, “त्यांनी अनेकदा चित्रपटांमध्ये अशी दृश्ये पाहिली आहेत, जिथे अपहरणकर्ते डोळ्यावर पट्टी बांधतात आणि त्याला एका निर्जन ठिकाणी घेऊन जातात आणि खंडणीची मागणी करतात”. (Mushtaq Khan kidnapping incident)
याबद्दल ते म्हणाले “माझ्याबरोबर हे असं काही घडेल असं मला कधीच वाटलं नव्हतं पण तसं झालं. ऑक्टोबर 2024 च्या शेवटच्या दिवसात त्यांना राहुल सैनी नावाच्या व्यक्तीचा फोन आला होता. तो नोएडामध्ये त्याला भेटला होता, असा दावा त्या व्यक्तीने केला आहे. राहुल नावाच्या व्यक्तीने अभिनेत्याला एका अवॉर्ड शोमध्ये आमंत्रित केले होते, जिथे त्याला दिग्गज कलाकारांचा सन्मान करायचा होता. येथे विविध क्षेत्रातील कलाकारांना पुरस्कारही देण्यात येणार होते”.
आणखी वाचा – 21 December Horoscope : प्रीती योगाच्या शुभ योगामुळे शनिवारचा दिवस ‘या’ राशीच्या लोकांसाठी खास, जाणून घ्या…
पुढे ते म्हणाले, “सुरुवातीच्या चर्चेनंतर त्या कार्यक्रमाला जाण्यासाठी माझी फी ७५,००० रुपये निश्चित करण्यात आली होती. माझ्या खात्यात २५,००० रुपये आधीच ॲडव्हान्स म्हणून दिले होते. त्यानंतर २० नोव्हेंबरला मुंबई ते दिल्ली विमानाचे तिकीट आणि दुसऱ्या दिवशीचे परतीचे तिकीटही पाठवण्यात आले. दिल्लीला पोहोचल्यावर मला मनोज नावाचा ड्रायव्हर दिसला. तो मला मेरठच्या दिशेने घेऊन गेला. राहुलने फोनवर मला सांगितले की, कार त्याला जैन शिकंजी स्टॉलवर सोडेल. तेथून दुसरे वाहन मला कार्यक्रमात घेऊन जाईल”.
आणखी वाचा – सूरज चव्हाणच्या नवीन घरासाठी डीपी दादा देणार फर्निचर, स्वतःच केला खुलासा, म्हणाले, “सहा महिन्यांत…”
पुढे मुश्ताक यांनी सांगितलं की, “पहिल्या कारमधील आणखी एक व्यक्तीदेखील त्या दुसऱ्या कारमध्ये उपस्थित होती आणि आणखी काही जण होते. काही वेळाने दोन लोकांनी माझ्याकडे बंदुकीचा इशारा केला आणि मला शांत राहण्यास सांगितले. यानंतर माझा चेहराही झाकण्यात आला. मग एका खोलीत गेलो जिथे अजून ६ लोक होते. पकडले जाण्याच्या भीतीने अपहरणकर्त्यांनी रोख रकमेची खंडणी मागितली होती. आता या सगळ्यात मला तेथून पळून जाण्याची योजना सुरु केली. त्यामुळे मी पळून जाण्यात यशस्वी झालो आणि ताबडतोब पोलिसांना सर्व काही सांगितले”.