शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

घरचं वीजबिल पाहूनच काजोलचा राग अनावर, आकडा मनाविरुद्ध असल्याने काय करावं हेच सुचेना, म्हणाली, “सूर्याचा उजेड…”

Shamal Sawantby Shamal Sawant
डिसेंबर 11, 2024 | 1:09 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
kajol on lightbill

काजोलने लाइटबिलासंदर्भात शेअर केली पोस्ट

बॉलिवूड अभिनेत्री काजोल सध्या खूप चर्चेत आली आहे. काजोलने अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. काजोल सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असलेली बघायला मिळते. नुकतीच काजोलने केलेली सोशल मीडिया पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. यामध्ये तिने तिच्या घरातील लाइट बिलामधील गडबड तिने सांगितली आहे. काजोलने इन्स्टाग्राम स्टोरीवर याबद्दलचा खुलासा केला आहे.  त्यामुळे आता याबद्दलची चर्चा मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. ही पोस्ट नेमकी कशाबद्दल आहे? या पोस्टमध्ये नक्की काय आहे? याबद्दल आपण आता सविस्तरपणे जाणून घेऊया. तसेच ही पोस्ट इतकी का चर्चेत आली? हेदेखील जाणून घेऊया. (kajol on lightbill)

महागाईचा फटका आता केवळ सामान्य जनतेलाच नाही तर बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनादेखील बसला आहे. नुकतीच कजोलने केलेली सोशल मीडिया पोस्टमध्ये याबद्दलचा खुलासा केला आहे. लाइटबिल बघून ती हैराण झाली आहे. काजोलने इन्स्टाग्राम स्टोरीवर लिहिले की, “मला माझं वीजबिल मिळालं. मला वाटत आहे की हे सूर्याच्या उजेडाचं बिल आहे. डिव्हाइन लाइटसाठी व बोगद्यात लावलेल्या शेवटच्या लाइटसाठी हे बिल आलं आहे”.

आणखी वाचा – सुनील पाल यांनी स्वत:च रचला स्वतःच्या अपहरणाचा खेळ?, ऑडिओ व्हायरल होताच म्हणाले, “डोक्यावर बंदूक असेल तर…”

काजोल व अजय हे दोघही मुलांबरोबर जुहू येथील एका अलिशान बंगल्यात राहतात. त्यांच्या बंगल्याचे नाव शिवशक्ती आहे. त्यांच्या या अलिशान बंगल्याची किंमत ६० कोटी रुपये आहे. दरम्यान काजोल व अजय यांची मुंबईमध्ये खूप संपत्ती आहे. काही दिवसांपूर्वीच जुहू येथे अजयने ऑफिससाठी कोट्यावधी रुपयांचा खर्च केला आहे.

आणखी वाचा – अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’चा वादाचा भोवरा, चित्रपटगृहात आढळला संशयास्पद मृतदेह, नेमकं प्रकरण काय?

दरम्यान काजोलच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर, याआधी ती ‘दो पत्ती’ या चित्रपटात दिसून आली होती. यामध्ये तिच्याबरोबर क्रिती सॅननदेखील दिसून आली होती. तसेच शाहीर शेखदेखील खलनायकाच्या भूमिकेत दिसून आला होता. यामध्ये काजोलने पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती. तसेच अजय देवगणचा ‘सिंघम अगेन’ हा चित्रपट भेटीला आला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती. काजोल आता ‘महाराघीनी’ या चित्रपटात दिसणार आहे. यामध्ये प्रभू देवादेखील असणार आहे.

Tags: bollywood actresskajollight bllsocial media post
Shamal Sawant

Shamal Sawant

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Zee Marathi Satvya Mulichi Satavi Mulgi serial will be off air soon Netra fame actress Titiksha Tawde shared video

'सातव्या मुलीची...' मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार, शूटचा शेवटचा दिवस, सेटवरील व्हिडीओ व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.