बॉलिवूड अभिनेत्री काजोल ही नेहमीच चर्चेत राहणारी अभिनेत्री आहे. आजवर ती अनेक हिंदी चित्रपटांमध्ये दिसून आली आहे. मात्र अभिनयापेक्षा ती इतर अनेक कारणांमुळे अधिक प्रसिद्ध होते. काही दिवसांपूर्वी काजोलचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. दुर्गा पूजेच्या वेळी ती पापाराझींवर भडकतानादेखील दिसून आली. तिचे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी तिची तुलना जया बच्चन यांच्याबरोबर केली आहे. तसेच तिच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून टीकादेखील करण्यात आली आहे. आशातच आता काजोलने स्वतः या सगळ्यावर प्रतिक्रियादेत आपले मत मांडले आहे. त्यामुळे ती आता पुन्हा एकदा चांगलीच चर्चेत आली आहे. (kajol statement on netizens reactions)
काजोल जया यांच्यासारखी वागते असे अनेकदा नेटकऱ्यांकडून म्हंटले गेले आहे. तसेच अभिनेत्री इतरांबरोबर असभ्य वर्तन करते, चीडचीड करते असेही म्हंटले आहे. त्यामुळे काजोलने आता सगळ्यांनाच खडे बॉल सुनावले आहेत. काजोलने नुकतीच ‘झुम’ला मुलाखत दिली. यावेळी ती म्हणाली की, “मी एक माणूस आहे. त्यामुळे माझ्या आयुष्यातदेखील चांगले आणि वाईट दिवस येतात. मलादेखील राग येतो. पण इतरांसाठी मी स्वतःला बदलणार नाही”.
पुढे ती म्हणाली की, “कॅमेरासमोर कलाकार कसे वागत आहेत याकडे लोकांचे अधिक लक्ष असते. या सगळ्यासाठी मी माझे वेगळे व्यक्तिमत्त्व तयार करणार नाही. पण मी जशी आहे तशी आहे. कोणीतरी माझ्याबद्दल काहीतरी विचार करत आहे यासाठी मी स्वतःमध्ये बदल करणार नाही. सेलिब्रिटी आहोत म्हणून आम्हाला राग येऊ शकत नाही हा विचार चुकीचा आहे”. दरम्यान काजोलच्या या वक्तव्याकडे सगळ्यांचेच लक्ष वेधले आहे. सोशल मीडियावर यावरुन चर्चादेखील सुरु आहेत.
काजोलच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, सध्या ती ‘दो पत्ती’ या चित्रपटामुळे अधिक चर्चेत आहे. यामध्ये तिच्याबरोबर कृती सेनन व शाहीर शेख हे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. कृती या चित्रपटात दुहेरी भूमिकेत दिसून येत आहे. हा चित्रपट 25 ऑक्टोबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे.