अभिषेक बच्चन व ऐश्वर्या राय बच्चन यांच्यातील मतभेदाच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहेत. नुकतेच या जोडप्याने अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या लग्नाला स्वतंत्रपणे हजेरी लावली होती. यामुळे त्यांच्या नात्यात दुरावा आला असल्याच्या अफवांना आणखी उधाण आले. अनुमानांना जोडून, अभिषेकने अलीकडेच घटस्फोटाच्या आव्हानांबद्दलची एक इन्स्टाग्राम पोस्ट लाईक केली यानंतर त्याच्या लग्नाबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले. अफवांच्या दरम्यान, जया बच्चनची एक जुनी मुलाखत पुन्हा व्हायरल होत आहे ज्यामध्ये ती सून ऐश्वर्याच्या गुणांबद्दल भाष्य करताना दिसत आहे. (Jaya Bachchan On Aishwarya Rai)
वास्तविक जया बच्चन ‘कॉफी विथ करण’मध्ये दिसल्या होत्या. या शोमध्ये जयाने आपली सून ऐश्वर्याचे खूप कौतुक केले होते. जया यावेळी असं बोलताना दिसल्या की, “ती एक मोठी स्टार आहे पण जेव्हा आम्ही सगळे एकत्र असतो तेव्हा मी तिला पुढाकार घेताना पाहिले नाही. मला तिचा हा गुण आवडतो की, ती मागे क्षणात उभी राहते आणि ऐकते”. जया यांनी आपल्या सूनेची नम्रता व शांत वर्तनाबद्दल प्रशंसा केली होती आणि सांगितले होते की, ऐश्वर्या बच्चन सहजपणे तिच्या कुटुंबात रुळली होती आणि त्यांचे जवळचे नाते होते.
या मुलाखतीत करणने सुचवले होते की, ऐश्वर्या जया यांची जबाबदारी हलकी करण्यास नक्की मदत करेल. यावेळी जया यांनी असं म्हटलं होतं की, काही कामांव्यतिरिक्त ऐश्वर्या आणखी मोठी जबाबदारीही स्वीकारेल. दरम्यान, श्वेता बच्चनने गंमतीत आईला इशारा दिला होता की, ऐश्वर्यावर फार लवकर भार टाकू नको”.
ऐश्वर्या व अभिषेकचे लग्न २००७ मध्ये झाले होते. या जोडप्याचे हे लग्न बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत असलेल्या लग्नांपैकी एक होते. या लग्नात फक्त जवळचे मित्र व कुटुंबातील सदस्य उपस्थित होते आणि यावेळी मीडियालाही परवानगी नव्हती. याबाबत अभिषेकने एका मुलाखतीत खुलासा केला होता की, ऐश आणि त्याच्या कुटुंबीयांना मोठे सेलिब्रेशन करायचे होते, पण आजी आजारी असल्यामुळे लग्न खासगी ठेवण्याचा निर्णय घेतला होता.