बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

हेमा मालिनींची वागणूकच बदलली, ‘तो’ व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी केली जया बच्चन यांच्याशी तुलना, व्हिडीओ व्हायरल

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑक्टोबर 22, 2024 | 3:06 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
hema malini getting trolled

हेमा मालिनी यांचा व्हिडीओ व्हेरल

बॉलिवूड अभिनेत्री हेमा मालीनी या लोकप्रिय अभिनेत्री आहेत. त्यांनी आजवर अनेक हिंदी चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका केल्या आहेत. हेमा या अभिनयाबरोबर राजकारणातदेखील अधिक सक्रिय आहेत. तसेच त्यांच्या नृत्यकलेचेदेखील कौतुक केले जाते. वयाच्या ७६ व्या वर्षी त्यांनी केलेल्या नृत्याला प्रेक्षकांची वाह वाहदेखील मिळते. काही महिन्यांपूर्वी त्यांची मुलगी ईशा देओल पतीपासून वेगळी होणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. यावेळी त्यांनी लेकीला पाठिंबा दिला असल्याचेदेखील जाहीर केले होते. तेव्हा मुलीला दिलेल्या पाठिंब्यामुळे त्यांचे कौतुकदेखील केले तर काही अंशी ट्रोलिंगलाही सामोरे जावे लागले. मात्र आता त्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आल्या आहेत. (hema malini getting trolled)

हेमा सध्या दिल्लीमध्ये असून नुकताच त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये त्यांची वागणूक बघून खूप चर्चादेखील होत आहे. तसेच त्यांची तुलना जया बच्चन यांच्याबरोबरही केली जात आहे. दरम्यान हेमा यांना दिल्ली येथे स्पॉट झाल्या. जेव्हा त्यांनी मीडियाला पाहिलं तेव्हा त्यांना खूप राग आला. मात्र त्यांनी पापाराझीना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर त्यांचे काही चाहते सेल्फी घेण्यासाठी आले पण हेमा यांनी लांब उभे राहून फोटो काढण्यास सांगितले.

आणखी वाचा – Video : मैत्री जपली! वैभव चव्हाणने दणक्यात साजरा केला सूरज चव्हाणचा वाढदिवस, म्हणाला, “सगळ्यांनी खांद्यावर उचलून…”

View this post on Instagram

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

हेमा यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. एका नेटकऱ्याने लिहिले की, “खूप ओव्हरॲक्टिंग करत आहे”, दुसऱ्या एकाने प्रतिक्रिया देत लिहिले की, “दुसरी जया व काजोल”, तसेच अजून एकाने लिहिले की, “ज्युनिअर जया बच्चन”.   

आणखी वाचा – “सहानुभूतीवरुन अनेक टोमणे मला मिळाले पण…”, दिव्यांगांसाठी अंकिता वालावलकरचं काम, म्हणाली, “कोकणातही गेले नाही…”

दरम्यान हेमा यांच्या कामाबद्दल त्यांनी पहिल्यांदा १९६३ साली तमिळ चित्रपटात काम केले. त्यानंतर १९६८ साली ‘सपनो का सौदागर’ चित्रपटात मुख्य अभिनेत्री म्हणून पदार्पण केले. त्यानंतर ‘सीता और गीता’, ‘शोले’, ‘बागबान’, ‘वीरझारा’ सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. २०२० साली ‘शिमला मिरची’ या चित्रपटात दिसून आल्या होत्या. तसेच त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर, त्या धर्मेंद्र यांच्याबरोबर लग्नबंधनात अडकल्या होत्या. दोघांच्याही वयात १३ वर्षाचे अंतर आहे.  

Tags: bollywood actresshema maliniviral video
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Bapya Marathi Movie Songs
Entertainment

‘कारट्या’ची धूम, ‘बाप्या’च्या युथफुल रॅप साँगचा सोशल मीडियावर धुमाकूळ, सिनेमॅटिक शूट लक्षवेधी

एप्रिल 14, 2026 | 4:46 pm
Alia Bhatt Has Opened Up About Motherhood
Entertainment

आलिया भट्टच्या तीन वर्षीय मुलीला वाटते अपयशाची भीती, सद्गुरुंना विचारलं, “मी चांगली आई आहे का?”

एप्रिल 14, 2026 | 2:24 pm
Abhishek Bachchan 0n IPL
Entertainment

“ते माझ्या बजेटच्या बाहेर होतं”, अभिषेक बच्चनने IPL मध्ये कोणताही संघ न खरेदी करण्यामागचे सांगितलं कारण, म्हणाला, “खूप महाग…”

एप्रिल 14, 2026 | 1:10 pm
Digambar Naik Controversy
Entertainment

‘दशावतार’ चित्रपटात दिगंबर नाईक पाहिजे होता?, अभिनेत्याने व्यक्त केली खंत, म्हणाले, ” मालवणी माणूस नको…”

एप्रिल 14, 2026 | 12:21 pm
Next Post
Salman Khan Blackbuck Case

"सलमानचे वडीलच खोटं बोलत आहेत आणि…", बिश्नोई गँगकडून सलमान खानला माफ करणार नसल्याचं भाष्य, म्हणाले, "चूक झाली…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.