अभिनेत्री दीपिका पदुकोण सध्या खूप चर्चेत आली आहे. दीपिकाने आजवर तिच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. इतकंच नाही तर दीपिका तिच्या ग्लॅमरस लूकने नेहमीच चाहत्यांच्या मनात घर करते. सप्टेंबर २०२४ मध्ये तिच्या मुलीला म्हणेजच दुआला जन्म दिला. त्यानंतर अभिनेत्री सार्वजनिकरित्या दिसली. बंगळुरूमध्ये गायक दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये अभिनेत्रीने हजेरी लावली होती. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. अशातच आता तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. यामध्ये पुन्हा एकदा ती मुलीबरोबर दिसून आली आहे. (deepika padukone with daughter)
दीपिका पुन्हा एकदा मुंबई येथील कलीना एअरपोर्टवर दिसून आली होती. याआधीदेखील ती मुलीबरोबर दिसून आली होती. मुलीच्या जन्मानंतर दीपिका बंगळुरुमध्ये राहत आहे. मात्र सध्या ती बंगळुरूवरुन परतल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. बंगळुरुमधून परतताना रणवीर सिंह कुठेही दिसून आला नाही. यावेळी नॅनी दिसली पण दीपिकाने स्वतः मुलीला घेतलं होतं. तसेच यावेळी तिने लाल रंगाचा ड्रेस परिधान केला होता. मोठा गॉगलदेखील लावला होता. दरवेळीप्रमाणे दीपिका याहीवेळी क्लासी लूकमध्ये दिसून आली.
बेंगळुरूमध्ये गायक दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये अभिनेत्रीने हजेरी लावली होती, जिथे ती आरामात बसून त्याच्या सुरांवर नाचत होती. यावेळी पांढरा स्वेटशर्ट आणि निळी जीन्स परिधान केलेल्या दीपिकाच्या चेहऱ्यावर डिलिव्हरीनंतरचा ग्लो दिसून येत आहे. यावेळी तिचा कॅज्युअल लूक साऱ्यांच्या पसंतीस पडला. तिचा व्हिडीओदेखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. कार्यक्रमादरम्यान दिलजीतने दीपिकाला मंचावरही बोलावलं होतं.
दीपिका व रणवीर १४ नोव्हेंबर २०१८ रोजी लग्नबंधनात अडकले. त्यानंतर लग्नाच्या पाच वर्षांनी म्हणजे ८ सप्टेंबर २०२४ रोजी दीपिकाने मुलीला जन्म दिला. ही आनंदाची बातमी एका हृदयस्पर्शी सोशल मीडिया पोस्टसह शेअर केली होती. यामध्ये त्यांनी लिहिले की, “मुलीचे स्वागत. ८-९-२०२४. दीपिका व रणवीर”. तेव्हापासून, दीपिका एक आई म्हणून तिची कर्तव्ये पार पाडताना सार्वजनिक देखाव्यापासून मोठ्या प्रमाणात दूर राहिली आहे. दीपिकाने तिच्या गरोदरपणातही काम सुरु ठेवले आणि तिच्या ‘कल्की 2898 एडी’ या चित्रपटाचे प्रमोशनही केले. मात्र, आई झाल्यानंतर ती लाइमलाइटपासून दूर राहिली.