‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेच्या कथानकात सध्या भुवनेश्वरीचं सत्य सूर्यवंशी कुटुंबीयांसमोर उघड झाल्याचा पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून भुवनेश्वरी चारुलताच्या रुपात सूर्यवंशी कुटुंबात राहत असते आणि अक्षराला वेडं ठरवण्याचा प्रयत्न करते. पण, ऐनवेळी अक्षरा तिची चोरी पकडते आणि भुवनेश्वरी-चारुहासच्या लग्नाचा डाव उधळून लावते. अक्षरावर सुरुवातीला कोणीही विश्वास ठेवण्यास तयार नसतं. पण, हळुहळू मास्तरीण बाई बजरंग विरोधात मोठा पुरावा गोळा करते. त्याच्याकडून हुशारीने सत्य वदवून घेत, अक्षरा हे रेकॉर्डिंग भर लग्नात लावते. यामुळे चारुहास भुवनेश्वरीवर भयंकर संतापतो आणि लग्न मोडतो. (Tula Shikvin Changlach Dhada serial update)
मात्र अधिपती त्याच्या आईची बाजू घेत सगळ्या प्लॅनची आधीच कल्पना असल्याचं मान्य करतो. यामुळे अक्षराला मोठा धक्का बसतो. अधिपतीने विश्वासघात केल्याची भावना तिच्या मनात निर्माण होते. पण, या सगळ्यातून हार न मानता भुवनेश्वरीचा खोटा चेहरा सर्वांसमोर उघड करायचा असं अक्षरा ठरवते. अशातच आता मालिकेत एक मोठा ट्विस्ट आला आहे, तो म्हणजे अक्षरा बजरंगच्या मदतीने भुवनेश्वरीचा डाव उधळून लावणार आहे. याचा एक प्रोमो नुकताच शेअर करण्यात आला आहे.
या नवीन प्रोमोमध्ये अक्षरा असं म्हणते की, “यांनी (भुवनेश्वरी) जे काही केलं आहे त्याला अजिबातच क्षमा नाही. म्हणून मी बाबांना शब्द दिला आहे. मी हा विषय अर्ध्यावरच सोडून देणार नाही”. यावर भुवनेश्वरी तिला असं म्हणते की, “आता नक्की काय विषय आहे तुमचा?”. यावर अक्षरा असं म्हणते की, “सत्य…” आणि यावर भुवनेश्वरी असं म्हणते की, “कसलं सत्य?” इतक्यात तिथे बजरंगला आणले जाते. याआधी बजरंगने अक्षराला भुवनेश्वरीचं सत्य सांगणार असल्याचे कबूल केलं होतं..
आणखी वाचा – “मला तिच्या रुपात मुलगीच झाली अन्…”, मृणाल कुलकर्णींनी सांगितलं सूनेबरोबरचं नातं, म्हणाल्या, “देवाने थेट…”
त्यामुळे आता अक्षराच्या म्हणण्यानुसार खरंच बजरंग सत्य सांगणार की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. प्रोमोमधील बजरंगच्या चेहऱ्यावरुन तरी तो पुन्हा पलटी मारणार असल्याचे वाटत आहे. पण नेमकं काय होतं ही आगामी भागात पाहायला मिळेल. तसंच या सगळ्यात अधिपती पुन्हा एकदा आपल्या आईची साथ देणार की बायकोची? हे पाहणेदेखील महत्त्वाचे ठरणार आहे