सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर उर्फी जावेद सध्या खूप चर्चेत आली आहे. तिच्या अतरंगी ड्रेसिंगमुळे उर्फी नेहमीच चर्चेचा विषय ठरते. याआधी उर्फीने हिंदी मालिकांमध्येही काम केले आहे. मात्र तिला अभिनेत्री म्हणून कधीही ओळख मिळाली नाही. तिच्या अतरंगी कपड्यांवरुन तिला अनेकदा ट्रोलदेखील केले. मात्र तिने कधीही ट्रॉलिंगकडे लक्ष दिले नाही. सोशल मीडियावर उर्फीचे अनेक फॉलोअर्स आहेत. आता ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पण कोणत्याही अतरंगी कपड्यांमुळे नाही तर वेगळ्याच कारणामुळे तिच्याबद्दल बोलले जात आहे. सोशल मीडियावर उर्फी पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनली आहे. (uorfi javed viral video)
नुकतीच उर्फी एका सोहळ्यासाठी उपस्थित राहिली होती. यावेळी तिने साडी नेसली होती. तिच्या या लूकने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले. उर्फीने निळ्या रंगाची साडी हटके पद्धतीने नेसली होती. तसेच केसांमध्ये एका वेगळ्या पद्धतीची फुलांची वेणीदेखील घातली होती. ही वेणी बघून सगळ्यांना ‘भूलभूलय्या’ चित्रपटातील मंजुलिका अर्थात विद्या बालनची आठवण आली. या सोहळ्यासाठी अनेक बॉलिवूड अभिनेत्रीदेखील सहभागी झाल्या होत्या.
दरम्यान यावेळी उर्फीने निळ्या रंगाची साडी नेसली आहे. तसेच जेव्हा ती कॅमेरासमोर जेव्हा पोज देण्यासाठी आली तेव्हा तिने साडीच्या पदराने स्वतःला कव्हर केले. यावर एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया देत लिहिले की, “साडीमध्ये खूप सुंदर दिसत आहे. ज्या प्रकारे तिने स्वतःचे शरीर झाकले आहे ते खूप छान वाटलं”. तसेच अजून एकाने लिहिले की, “ही आधीच कपडे ठीक करणार होती. पण केले नाहीत. कॅमेरासमोर येऊन केले कारण तिला पब्लिसिटी स्टंट करायचा होता”.
तसेच या ठिकाणी जान्हवी कपूरदेखील आली होती. मात्र जान्हवीचा लूक बघून तिच्या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिली की, “आज हिला बघून उर्फीची आठवण येत आहे आणि उर्फी जान्हवी कपूर बनून फिरत आहे”. दरम्यान उर्फीच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर, उर्फीची प्राइम व्हिडीओ सीरिज ‘फॉलो कर लो यार’ प्रेक्षकांच्या भेटीस आली होती तसेच तिच्या कपड्यांमुळेही चर्चेत असते. सोशल मीडियावर ती खूप सक्रिय असलेली दिसून येते. तिचे इन्स्टाग्रामवर ५.२ मिलियन फॉलोअर्स आहेत.